Anil Deshmukh Injured: विधानसभेचा प्रचार थंडावल्यानंतर काल नागपूरमध्ये राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते अनिल देशमुख यांच्या वाहनावर अज्ञात लोकांनी हल्ला केला. या हल्ल्यात देशमुख यांच्या डोक्याला दुखापत झाली. या हल्ल्यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. विरोधकांनी यासाठी सरकारला जबाबदार धरले आहे. या हल्ल्यानंतर नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी माहिती देताना सांगितले की, सोमवारी रात्री ८ वाजता अनिल देशमुख यांची गाडी नरखेडपासून परत येत असताना गाडीवर दगडफेक झाली. पोलिसांनी ही घटना गांभीर्याने घेतली असून आमचा तपास सुरू आहे. या घटनेनंतर संवेदनशील भागांमध्ये पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in