माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक पत्र लिहिले आहे. जामिनावर तरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यांचे हे मुख्यमंत्र्यांना पहिलेच पत्र आहे.काटोल व नरखेड तालुक्यातील विशेषत: नरखेड तालुक्यातील जनतेला नागपूर येथे न्यायालयीन कामासाठी ये-जा करणे त्रासदासक होते. यामुळे काटोल येथे वरिष्ठ स्तर दिवानी न्यायालयाची मागणी आहे. त्या संदर्भात नरखेड व काटोल तालुका वकील संघाने सुद्धा मागणी केली होती.

हेही वाचा >>>नागपूर: सक्तीची रजा वाढली, धवनकरांवर कठोर कारवाई नाहीच; चौकशी समितीचा अहवालही प्रलंबित

मुंबई येथील उच्च न्यायालयात प्रस्ताव सादर करण्यात आला. या प्रस्तावाला मुंबई उच्च न्यायालयाच्या समितीने तत्त्वत: मान्यता दिली असून पुढील मंजुरीसाठी तो राज्य शासनाच्या विधि व न्याय विभागाला पाठवला आहे. या विभागाने यासंदर्भात पुढील प्रक्रिया करावी, अशी मागणी अनिल देशमुख यांनी केली आहे.

Story img Loader