नागपूर : भाजपने गेल्या अनेक निवडणुकांमध्ये नागपुरातील पश्चिम आणि दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघात विजय संपादन केला आहे. या मतदारसंघाचे नेतृत्व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गेल्या २५ वर्षांपासून करीत आहेत.

देवेंद्र फडणवीस पश्चिम नागपूरमधून १९९९ ला पहिल्यांदा आमदार झाले. २००९ मध्ये मतदारसंघाची पुर्नरचना झाली. त्यानंतर ते दक्षिण-पश्चिम नागपूरचे नेतृत्व करीत आहेत. हा मतदारसंघ ओबीसीबहुल आहे. मात्र, भाजपने या मतदारसंघावर पकड निर्माण केली आहे. फडणवीस यांना या मतदारसंघात आव्हान देण्यासाठी महाविकास आघाडीमध्ये चर्चा सुरू आहे. संभावित उमेदवाराची चाचपणी सुरू आहे. काँग्रेसकडून गेल्या निवडणुकीत  आशीष देशमुख यांनी निवडणूक लढवली होती. आता ते भाजपमध्ये आहेत.  आता येथे काँग्रेसकडून माजी नगरसेवक प्रफुल्ल गुडधे इच्छुक आहेत. गुडधे यांचे वडील विनोद गुडधे यांनी भाजपकडून पश्चिम नागपूरचे नेतृत्व केले आहे. त्यानंतर ही जागा भाजपने फडणवीस यांना  दिली. पुढे पश्चिम आणि दक्षिण-पश्चिम असे या मतदारसंघाचे दोन भागात विभाजन झाले. दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला आहे. या मतदारसंघातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते अनिल देशमुख यांना मैदानात उतरवण्यात येणार असल्याची चर्चा आहे. असे झाल्यास या मतदारसंघात विद्यमान गृहमंत्री फडवीस विरुद्ध माजी गृहमंत्री देशमुख अशी लढत होण्याची शक्यता आहे.

eknath shinde Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse at Rajkot Fort Malvan Sindhudurg
Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse : मालवणमधील शिवाजी महाराजांचा पुतळा कशामुळे पडला? एकनाथ शिंदेंनी सांगितलं कारण
how does suiceide pod work
इच्छामरणासाठी तयार करण्यात आलेले ‘सुसाईड पॉड’ काय आहेत? हे मशीन कसे कार्य करते? याची चर्चा का होत आहे?
Bhagyashree Dharmarao Atram is an election candidate from Sharad Pawar group against Dharmarao Baba
राष्ट्रवादीच्या मंत्र्यांविरोधात त्यांच्या कन्येला उमेदवारी, अनिल देशमुखांनी स्पष्टच सांगितले…
Rajiv Kumar on Maharashtra Assembly Election Date Schedule in Marathi
Maharashtra Assembly Election : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीबाबत निवडणूक आयोगाच्या आयुक्तांचं मोठं विधान, म्हणाले…
Bhagwan Rampure on Statue Collapse
Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse : “चूक शिल्पकाराची नाही, मला दुःख आहे की…”, प्रख्यात शिल्पकार भगवान रामपुरे यांचा सरकारवर गंभीर आरोप
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
Devendra Fadnavis on CM face
Devendra Fadnavis on CM face: “शरद पवारांच्या डोक्यात मुख्यमंत्रीपदाचं नाव शिजतंय”, देवेंद्र फडणवींसाचं मोठं विधान; म्हणाले, “उद्धव ठाकरेंना..”
Female Doctor Suicide
Doctor Suicide : “डिअर अहो, बाय! मी मेल्यावर…” सात पानी पत्र लिहून डॉक्टर महिलेची आत्महत्या, पतीच्या छळाला कंटाळून उचललं पाऊल

हेही वाचा >>>राष्ट्रवादीच्या मंत्र्यांविरोधात त्यांच्या कन्येला उमेदवारी, अनिल देशमुखांनी स्पष्टच सांगितले…

देवेंद्र फडवीस यांनी खोट्या शपथपत्रावर स्वाक्षरी करण्यासाठी दबाब निर्माण केला होता. त्याला भीक न घातल्याने तुरुंगात जावे लागले, असा आरोप अनिल देशमुख यांनी केला होता. त्यानंतर फडणवीस आणि देशमुख यांच्यात आरोपप्रत्यारोप झाले. तेव्हापासून देशमुख हे फडणवीस यांच्या विरोधात निवडणूक लढण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. 

अनिल देशमुख यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांना  देवेंद्र फडणवीसांविरुद्ध निवडणूक लढण्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी अधिक बोलण्याचे टाळले. तत्पूर्वी त्यांनी “मी कधीही एकटा निर्णय घेत नाही. पक्षाकडून जे काही आदेश दिले जातात, त्यावर मी निर्णय घेतो”, अशी प्रतिक्रिया दिली. देशमुख यांना फडणवीस विरुद्ध निवडणूक लढणार का, असा थेट प्रश्न विचारण्यात आला. परंतु त्यावर हो किंवा नाही, असे थेट उत्तर देण्याचे त्यांनी टाळले.