नागपूर : १०० कोटी रूपयांच्या खंडणीच्या तक्रारी वरून अनेक महिने तुरुंगवास भोगलेले राष्ट्रावादी कॉंग्रेसचे नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे त्यांच्या काटोल विधानसभा मतदारसंघात शुक्रवारी आगमन झाल्यावर कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले. देशमुख यांचे वाहान काटोल हद्दीत पोहोचताच कार्यकर्त्यांनी ढोल ताश्यांच्या गजरात फटाक्यांच्या आतषबाजीत त्यांचे स्वागत केले. त्यांची मिरवणूक काढण्यात आली त्यात हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते. जि.प.स्टेडियमवर त्यांची जाहीर सभा झाली.
सभास्थळी देशमुख पोहचताच पस्थित कार्यकर्त्यांनी अनिलबाबू आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. तब्बल दोन वर्षानंतर मतदारसंघात आलेले देशमुख कार्यकर्ते आणि समर्थकांनी केलेल्या स्वागताने भारावून गेले होते. सभेला उपस्थित जनसागर हाअनिल देशमुख यांचीलोकप्रियता कायम असल्याची प्रचिती देत होती.
हेही वाचा >>> कोण काय काम करतं मला चांगलं ठाऊक; मी गृहमंत्री, फडणवीस यांचा रोख कोणाकडे?
देशमुख यांनी जाहीर सभेत ईडी- सी बी आय- इन्कम टॅक्स कडून झालेल्या छळाची कहानी सांगितली. हायकोर्टाचे निरीक्षण वाचून दाखविले . शरद पवार साहेब व राष्ट्रवादी कॉंग्रेसज्ञपक्षाचे आभार मानले. आर्थररोड कारागृहात किती यातना सहन कराव्या लागल्या जेल मधील कठीण प्रसंग सांगितले. आरोप करणारे फरार झाले आम्हाला अग्निपरीक्षेला तोंड द्यावे लागले, याचे दुःख कधीही विसरणार नाही असे देशमुख यांच्या पत्नी आरतीताई म्हणाल्या.