राष्ट्रवादीचे नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख तब्बल २१ महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर शनिवारी त्यांच्या नागपूर येथील स्वगृही परत येणार असून त्यानिमित्ताने त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्ते आणि कुटुंबीयांनी जोरदार तयारी सुरू केली आहे.भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर ई.डी.ने देशमुख यांना अटक केली होती. ते एक वर्ष दीड महिना कारागृहात होते.
हेही वाचा >>>नागपूर: विद्यापीठाच्या परीक्षेत पुन्हा चुका; जुन्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नपत्रिका
अनिल देशमुख यांच्या न्यायालायने सशर्त जामीन दिला आहे. त्यांनी न्यायालयाला मुंबई बाहेर जाण्याची परवानगी दिली होती. न्यायालयाने ती विनंती मान्य केली. देशमुख उद्या, शनिवारी नागपुरात येत आहेत. त्यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी केली आहे. शहरात पोस्टर लावले आहेत.
हेही वाचा >>>नागपूर: भारत वि.ऑस्ट्रेलिया सामना, नागपूरमध्ये थेट मैदानातूनच सट्टा खेळणाऱ्या चौघांना अटक
देशमुख मुंबईहून नागपुरात येतील. विमानतळावरून सहकुटुंब थेट ते वर्धा मार्गावरील साईबाबा मंदिरात जातील आणि दर्शन घेतली. त्यानंतर संविधान चौकात जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करतील.