लोकसत्ता टीम

नागपूर : विधानसभा निवडणुकीच्या निकालाने अनेक धक्के दिले. काही ठिकाणी घराणेशही संपुष्टात आली तर काही ठिकाणी ती उदयास आली. नागपूर जिल्ह्यातील काटोल आणि सावनेर हे दोन मतदारसंघ याचे उदाहरण ठरावे. काटोलमध्ये ३० वर्षापासून वर्चस्वस्थापन करणारे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख पराभूत झाल्याने तेथील घराणेशाहीला ब्रेक लागला तर सावनेर मतदारसंघात तीस वर्षानंतर भाजपचे आशीष देशमुख यांच्या विजयाने दुसऱ्या घराणेशाहीचा उदय झाला.

मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Manmohan Singh launched the Technology Mission on Citrus for orange growers in Vidarbha
डॉ.मनमोहन सिंग, नागपूरची संत्री आणि ‘मिशन सिट्रस’
Cyber ​​criminals cheated the people of Nagpur of Rs 141 crore
सायबर गुन्हेगारांनी नागपूरकरांना घातला १४१ कोटींचा गंडा, १३ हजारांवर तक्रारी
The authority is taking possession of houses distributed to 21 people with fake documents
घर असतानाही पात्र झालेल्या २१ झोपडीवासीयांविरुद्ध कारवाई ! सर्व घरे ताब्यात घेणार!
raining in Akola district during the winter season
अकोला: ऐन हिवाळ्यात पावसाचा तडाखा; वातावरणातील बदलाने…
Prices will increase due to reduced arrival of chillies Nandurbar news
यंदा लाल तिखटाचा भडका उडणार; मिरचीची आवक घटल्याने दर वाढणार
The work on six water tanks of Pune Municipal Corporation is still not complete Pune print news
सहा टाक्या, तरी पाणी मिळेना! पुण्यातील प्रकार

काटोल मतदारसंघातून १९५ ते २०१९ अशा या दरम्यान फक्त २०१४ वगळता अनिल देशमुखच पंचवाीस वर्षापासून विजयी होत आले आहे. अनिल देशमुख यांचा बालेकिल्ला अशी ओळख काटोल मतदारसंघाची होती. २०२४ मध्ये स्वत: देशमुख रिंगणात न उतरता त्यांनी मुलगा सलील देशमुख यांना रिंगणात उतलवले त्यांचा भाजपचे चरणसिंह ठाकूर यांनी यावेळी पराभूत करून काटोलमधील देशमुख राज्य संपुष्टात आणले. काटोलची निवडणूक अनेक अर्थाने महत्वपूर्ण होती. माजी गृहमंत्री विरुद्ध विद्यमान गृहमंत्री अशी किनार या निवडणुकीला देशमुख विरुद्ध फडणवीस यांच्यातील राजकीय संघर्षामुळे लागली होती.या पार्स्वभूमीवर काटोलच्या भूमीत देशमुखांचा भाजपने केलेला पराभव महत्वाचा मानला जातो.

आणखी वाचा-Ballarpur Vidhan Sabha Seat : हा तर लाडक्या बहिणींचा आशीर्वाद, मुनगंटीवार म्हणतात, “विजय झाला तर माजायचे…”

सावनेर मतदारसंघ हा काँग्रेस नेते रणजीत देशमुख यांचा मतदारसंघ, तेथून ते अनेक वेळा निवडून आले होते.त्यानंतर तब्बल ३० वर्षानंतर रणजीत देशमुख यांचे पुत्र व भाजप उमेदवार आशीष देशमुक हे या मतदारसंघातून विजयी झाले. त्यामुळे सावनेरमध्ये तीस वर्षानंतर देशमुख पर्वाचा उदय झाला आहे.

आणखी वाचा-‘राणाजी माफ करना…’ गाण्‍यावर नवनीत राणा थिरकल्‍या!

गकाटोल प्रमाणेच सावनेर मतदारसंघालाही राजकीय घराणेशाहीची व संघर्षाची किनार आहे.. नागपूर जिल्ह्यातील काँग्रेसमधील देशमुख-केदार हा वाद सर्वश्रुत आहे. रणजीत देशमुख यांच्यानंतर सावनेर मतदारसंघावर सुनील केदार यांनी एकहाती पकड भक्कम केली होती. ते सलग चारवेळा येथून विजयी झाले होते. २०२४ मध्ये बँक गैरव्यवहार प्रकरणात ते दोषी ठरल्याने त्यांना अपात्र ठरवण्यात आले. त्यामुळे त्यांनी यावेळी पत्नी अनुजा केदार यांना रिंगणात उतरवले होते. दुसरीकडे भाजपने आशाीष देशमुख यांना रिंगणात उतरवून पुन्हा केदार विरुद्ध देशमुख या वादाला फोडणी घातली होती. आशीष या मतदारसंघातून यापूर्वी दोनदा पराभूत झाल्याने ते यावेळी केदार यांच्या किल्ल्याला सुरूंग लावू शकतील का असा प्रस्न विचारला जात होता. दुसरीकडे स्वत: आशीष देशमुख या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास तयार नव्हते.पण अखेरच्या क्षणी त्यांना सावनेरमधून उमेदवारी देण्यात आली आणि त्यांनी सावनेरचा गड सर केला.

Story img Loader