नागपूर: ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प म्हणजे वाघांची खाण असे म्हणले तर खोटे ठरणार नाही. त्यांची एक झलक पाहण्यासाठी देशविदेशातील कानाकोपऱ्यातून पर्यटक येतात. त्यात आपले सेलिब्रिटी कसे मागे राहणार!

सचिन तेंडुलकर तर ताडोबातील वाघांचा भक्त! वर्षातून किमान दोनदा तरी त्याच्या न चुकता ताडोबातील व्याघ्रदर्शनासाठी वाऱ्या होतात. आता भारतीय क्रिकेरमधील “स्पिनर” अनिल कुंबळे देखील ताडोबात दाखल झाला आहे.

हेही वाचा… १३ व्या शतकातील पाषाण मूर्ती बुध्द विहारात आढळली; पाच फूट लांब, ४४ सेंटिमीटर रुंद व दीड फूट जाड

भारतीय क्रिकेटमधील उत्कृष्ट गोलंदाज अनिल कुंबळे ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात दाखल झाला आहे. मात्र, त्याने व्याघ्रदर्शनासाठी ताडोबाचे गाभा क्षेत्र न निवडता बफर क्षेत्राला पसंती दिली. या व्याघ्रप्रकल्पाचा निमढेला प्रवेशद्वारावर तो दाखल झाला आणि पहिल्याच फेरीत त्याचे ‘भानुसखिंडी’ च्या बछड्यांनी दर्शन देत स्वागत केले.

हेही वाचा… आणाभाका एकीशी अन लग्न दुसरीशी…

‘भानुसखिंडी’ ने काही महिन्यांपूर्वी एक मादी आणि दोन नर बछड्यांना जन्म दिला. यातील निळ्या डोळ्यांच्या “नयनतारा” ने सध्या पर्यटकांना चांगलेच वेड लावले आहे. तर राम आणि लक्ष्मण हे दोन बछडेसुद्धा पर्यटकांना खिळवून ठेवत आहे. या तिन्ही बछड्यांनी भारतीय क्रिकेटपटू अनिल कुंबळे याला दर्शन दिले. या व्याघ्रदर्शनाने तो सुखावला आणि निमढेला प्रवेशद्वारावरील उत्कृष्ट व्यवस्थापनाबद्दल त्याने कौतुक देखील केले. आठवण म्हणून त्याने या सर्व वनरक्षकांसोबत छायाचित्र सुद्धा काढले.

Story img Loader