वर्धा : सदैव वादाने चर्चेत राहणारे स्थळ म्हणून अलीकडे महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिन्दी विद्यापीठाचे नाव दुमदुमत आहे. गेल्या काही महिन्यांपासून विद्यार्थ्यांचे डावे व उजवे म्हणजे हिंदुत्ववादी असे दोन गट उघड पुढे आले आहे. त्यातूनच आता धार्मिक वाद रंगू लागले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

रामनवमीचा वाद पेटल्यानंतर संत तुकाराम महाराज यांच्या मूर्तीची विटंबना झाल्याचे प्रकरण गाजले. हा विद्यापीठातीलच एका गटाचा प्रताप असल्याचा आरोप विद्यार्थी परिषदेने केला होता. मग त्याची तक्रार पोलिसांकडे झाली. पोलिसांनी चौकशी सुरू केली. तपासात पोलिसांनी अफलातून तर्क मांडला. मूर्तीचे नाक हे जनावरांनी धडक दिल्याने तुटल्याचे उत्तर विद्यापीठ प्रशासनास देण्यात आल्याची माहिती मिळाली.

हेही वाचा – पटोले-वडेट्टीवार यांच्यात जुंपली; जिल्हाध्यक्षाच्या हकालपट्टीवरून मतभेद

नेमके नाकच तोडण्याचा अचूकपणा मुक्या पशूने कसा दाखविला, याबाबत कुतूहल व्यक्त होत आहे. याबाबत विद्यापीठ प्रशासनाने भाष्य करण्यास नकार दिला.