नागपूर: भविष्यात मराठा समाजाचे १ लाख उद्योजक घडविण्याचा मानस आहे, अशी घोषणा अण्णसाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – अनिल परब यांनी कोणाला वाहिली श्रद्धांजली, विधान परिषदेत गदारोळ

हेही वाचा – मध्य प्रदेशातील ‘शिव’राज संपुष्टात, गोंदियातील सासरवाडीत निराशा; मुख्यमंत्रिपदी निवड हुकल्याने…

नरेंद्र पाटील पुढे म्हणाले, अण्णसाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा समाजातील युवकांना अनुदान देण्याची योजना राबविण्यात आली होती. आतापर्यंत त्या योजनेचा ७२ हजार मराठ्यांनी लाभ घेतला असून ५,७०० कोटींचे कर्जवाटप झाले आहे. राज्य सरकारने महामंडळाच्या माध्यमातून ६०० कोटींचा व्याज परतावा दिला आहे. भविष्यात मराठा समाजाचे १ लाख उद्योजक घडविण्याचा मानस आहे. अण्णसाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला यंदा पंचवीस वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त महामंडळाच्या विशेष लोगोचे अनावरण मंगळवारी झाले. त्यानंतर नरेंद्र पाटील यांनी प्रसामारध्यमांशी संवाद साधत महामंडळाच्या विविध योजनांबाबत माहिती दिली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Annasaheb patil economic development corporation will create one lakh maratha entrepreneurs says narendra patil mnb 82 ssb