नागपूर : सरळसेवा भरतीसाठी विद्यार्थ्यांकडून आकारण्यात येणाऱ्या वारेमाप परीक्षा शुल्कामुळे शासनाने विद्यार्थ्यांची लूट मांडल्याची टीका होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भरतीप्रक्रियेच्या एका जाहिरातीतील सर्व पदांसाठी एकच शुल्क आकारण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, या घोषणेला पंधरा दिवस उलटूनही उपमुख्यमंत्र्यांची सूचना वास्तवात न उतरल्याने उमेदवारांची लूट सुरूच आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सरळसेवा पदभरती प्रक्रियेत प्रत्येक पदासाठी स्वतंत्र शुल्क आकारले जाते. त्यामुळे वेगवेगळ्या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे हजारो रुपये खर्च होतात. याबाबत आमदार रोहित पवार यांनी पावसाळी अधिवेशनात मुद्दा उपस्थित केला होता. या विषयावर अधिवेशनात चर्चा झाली होती. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी काही दिवसांआधी वित्त आणि नियोजन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून राज्याच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेतला. या बैठकीत पदभरतीच्या जाहिरातीत प्रत्येक पदासाठी स्वतंत्र शुल्क आकारल्याच्या मुद्यावरही चर्चा झाली.

हेही वाचा – नागपूर: मंत्र्यांच्या पत्रात माजी आमदारांचा आमदार असा उल्लेख, विद्यमान संतापले

हेही वाचा – ‘एम.ए.’च्या अभ्यासक्रमात भाजप, रामजन्मभूमी आंदोलन; नागपूर विद्यापीठामध्ये काँग्रेस, कम्युनिस्टांच्या इतिहासाला कात्री

राज्य सरकारच्या काही विभागांनी काढलेल्या पदभरतीच्या जाहिरातीत प्रत्येक पदासाठी स्वतंत्र परीक्षा शुल्क आकारल्याचे पुढे आले आहे. ही बाब उमेदवारांवर अन्याय करणारी असून, एका जाहिरातीतील सर्व पदांसाठी एकच शुल्क आकारण्यात यावे, अशा सूचना अजित पवार यांनी बैठकीत अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्यामुळे यापुढे उमेदवारांना एकच शुल्क भरावे लागणार असल्याने सर्वांमध्ये आनंदाच वातावरण होते. मात्र, अद्यापही हा निर्णय लागू झाला नसल्याने उमेदवारांना विविध पदांच्या भरतीसाठी वेगळे शुल्क भरावे लागत असल्याने आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्यामुळे शासनाने तात्काळ शुल्कामध्ये कपात करावी, अशी मागणी होत आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Announcement of one fee for all posts in direct service recruitment in maharashtra is not implemented dag 87 ssb
Show comments