बुलढाणा: हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात तिघे जण ठार तर चालकासह दोघे जण जखमी झाले. मृत एकाच कुटुंबातील असून त्यामध्ये आईवडील आणि मुलाचा समावेश आहे. त्यांची मुलगी आणि चालक जखमी झाले असून त्यांच्यावर सिंदखेड राजा येथील शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.

आज गुरुवारी, ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी भरधाव अनियंत्रित इंडिगो कार समोरून जाणाऱ्या माल वाहक वाहनाला (ट्रकला) धडकल्याने ही भीषण दुर्घटना घडली. समृद्धी द्रुतगती महामार्गाच्या नागपूर कॉरिडॉरवर चॅनेल क्रमांक ३३४.६०० जवळ हा अपघात घडला असल्याची माहिती महामार्ग पोलिसांच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.

Palghar MLA Shrinivas Vanga return
Shrinivas Vanga: ‘आधी रडले, ठाकरेंना देव म्हणाले’, घरी परतल्यावर आमदार श्रीनिवास वनगांचे सूर बदलले; म्हणाले, “एकनाथ शिंदे…”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Chandrashekhar Bawankule, rebellion BJP,
भाजप पक्ष आईसारखा, जे अर्ज मागे घेणार नाही त्यांच्यावर…; बावनकुळे थेटच बोलले
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
Manoj Jarange Patil maulana sajjad nomani
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे आता दिल्ली हादरवणार? मुस्लीम, बौद्ध धर्मगुरुंची साथ? रणनिती तयार, हिंदीचा अडथळाही दूर
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Former CM Devendra Fadnavis of the BJP and Sena leader Sanjay Raut Meet
Meeting of Devendra Fadnavis and Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्या ‘फोटो ऑफ द डे’ ची इनसाईड स्टोरी काय?
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?

हेही वाचा – भाजप पक्ष आईसारखा, जे अर्ज मागे घेणार नाही त्यांच्यावर…; बावनकुळे थेटच बोलले

u

पोलीस उपनिरीक्षक पवार आणि त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह बाहेर काढले. जखमींवर प्राथमिक उपचार करून सिंदखेड राजा येथे उपचारासाठी हलविले. अपघातामुळे नागपूर कॉरिडॉरवरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत केली. अपघातग्रस्त वाहनाला ‘बॅरिगेटिंग’ करण्यात आले नंतर समृद्धीवरील वाहतूक पूर्ववत सुरू झाली.

नागपूर कॉरिडॉर वरील क्रमांक ३३४.६०० जवळ पुणे येथून अमरावतीकडे जाणाऱ्या एमएच १७ एजे ९१७३ क्रमांकाच्या इंडिगो कारने ट्रक (क्रमांक एम एच २१ बी एच ५९७६) ला मागून उजव्या बाजूने भरवेगात धडक दिली. यामुळे कारमधील प्रवाशी शुभांगी दाभाडे वय ३२ वर्ष, राजेश दाभाडे वय ४२ वर्ष हे जागीच मयत झाले. तसेच कारमधील रियांश राजेश दाभाडे वय ४ वर्ष याला रुग्णवाहिकेद्वारे उपचारसाठी नेत असताना वाटेतच मृत्यू झाला. याशिवाय समीक्षा राजेश दाभाडे आणि वाहनचालक आश्विन धनवरकर हे किरकोळ जखमी झाले आहे. त्यांच्यावर रुग्णवाहिकामध्ये औषधोपचार करण्यात आला आहे. ट्रकचालक खाजा शेख (राहणार जालना) याला सिंदखेडराजा पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

हेही वाचा – धानोरकर कुटुंबात फूट, खासदार धानोरकर लाडक्या भावाच्या पाठीशी, भासरे अनिल धानोरकर ‘वंचित’

दूसरबीड येथील १०८ रुग्णवाहिकेमधील डॉ. अक्षय विघ्ने, डॉ. वैभव बोराडे, चालक शैलेश दळी, दिगांबर शिंदे यांनी जखमीवर उपचार केले. तसेच सिंदखेड राजा ग्रामीण रुग्णालयात हलवले. यावेळी बचाव कार्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक पवार, पोलीस हवालदार राठोड, पोलीस जमादार किरके तसेच नाईक, पाटील, १०८ रुग्णवाहिकेचे डॉ. वैभव बोराडे व चालक शिंदे आदी सिदखेड राजा व दुसरबीड चमूतील कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

Story img Loader