नागपूर : नागपूर पोलिसांनी नवजात बाळ विक्री करणाऱ्या टोळीवर राज्यातील पहिला मोक्का लावला होता. त्यानंतर गुन्हे शाखेने आणखी एका बाळ विक्री करणाऱ्या टोळीचा छडा लावला. टोळीप्रमुख राजश्री सेन हिच्यासहसहा जणांवर गुन्हा दाखल केला. या टोळीने नवजात बाळाची गोंदीयातील एका व्यापाऱ्याला ३ लाखांत विक्री केल्याचे उघडकीस आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राजश्री सेन (शांतीनगर) ही परराज्यातील व्यापाऱ्यांना नवजात बाळ विक्री करणारी टोळी चालवित असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या एएचटीयू विभागाच्या प्रमुख रेखा संकपाळ यांना मिळाली होती. राजश्री सेनच्या प्रत्येक हालचालींवर पोलीस लक्ष ठेवून होते. राजश्री हिने पंकज कोल्हे (वय ३५), पिंकी उर्फ सुजाता लेंडे (२८, कळमना), सचिन पाटील (इंदोरा,जरीपटका), प्रिया सुरेंद्र पाटील (३५, रा.लोहगाव,पुणे) आणि छाया मेश्राम यांना बाळ विक्री करणाऱ्या टोळीत घेतले. पुण्यातील ४ मुले असलेल्या एका गरीब दाम्पत्याला प्रिया पाटील भेटली आणि एक बाळ मैत्रिणीला दत्तक देण्यासाठी तयार केले.

हेही वाचा – नागपूर: गुंगीचे औषध देऊन मुलीवर बलात्कार; गर्भपातही केला

डिसेंबर २०१९ मध्ये दाम्पत्याला घेऊन प्रिया नागपुरात आली. राजश्री सेनने लगेच गोंदियातील निपुत्रिक असलेल्या किराणा व्यापाऱ्याशी संपर्क केला आणि ५ ते ७ लाख उकळण्याचा कट रचला. राजश्री सेनने बनावट दत्तकपत्र तयार केले आणि व्यापारी दाम्पत्याला बाळ सोपवले. त्यांना पोलिसात तक्रार देण्याची भीती घालून ३ लाख रुपये उकळले.

या प्रकरणाचा छडा पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अप्पर आयुक्त संजय पाटील, उपायुक्त मुमक्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनात एएचटीयूच्या प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक रेखा संकपाळ, समाधान बकबककर, सुनील वाकडे, नाना ढोके, दीपक बिंदाने, मनिष पराये, अश्विनी खोडपेवार, ऋषिकेश डुंबरे आणि शरीफ शेख यांनी केली.

तीन लाखांत बाळाची विक्री

पिंकी लेंडे ही विवाहित असून तिचे पंकज कोल्हेशी प्रेमसंबंध आहेत. दोघेही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतात. दोघांनाही संसार थाटण्यासाठी पैशाची गरज होती. बाळाची विक्री करणाऱ्या टोळीची प्रमुख राजश्री सेने हिने त्यांना टोळीत घेतले. झटपट पैसे कमविण्याच्या नादात पिंकी आणि पंकजने पुण्यातील दाम्पत्याच्या बाळाच्या विक्रीचा कट रचला. तीन दिवसांच्या बाळाला व्यापाऱ्याला देऊन ३ लाख रुपये उकळण्यात आले.

हेही वाचा – चंद्रपूर : मुलीची अश्लील चित्रफित तयार केल्याने खळबळ, महिलेसह १४ आरोपींना अटक

असा लागला बाळ विक्रीचा छडा

गेल्या काही दिवसांपासून राजश्री सेन आणि तिचा प्रियकर दोघेही एका बाळाची विक्री करण्याच्या तयारीत होते. एएचटीयूच्या पथकाला ही टीप मिळाली. त्यावरून राजश्रीच्या हालचालींवर बारिक लक्ष ठेवण्यात आले. शेवटी राजश्रीने गोंदीयातील व्यापाऱ्याची फसवणूक करून बाळाच्या बदल्यात ३ लाख रुपये घेतल्याची माहिती समोर आली. तपासाअंती टोळीतील सहाजणांवर गुन्हे दाखल करून टोळीप्रमुख राजश्री सेन आणि पिंकी लेंडे हिला अटक केली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Another baby sell gang busted in nagpur sale of three day old baby for three lakhs adk 83 ssb
Show comments