नागपूर : नामीबियातून आणलेल्या ‘ओमान’ या चित्त्याने मध्यप्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानातून गावाचा रस्ता धरला. यापाठोपाठ आणखी एक चित्ता भरकटून गावात पोहोचल्याचे समोर आले आहे. ‘ओमान’नंतर आता ‘ओबान’ या चित्त्याने गावाचा रस्ता धरला आहे. झारबडोदानंतर आता तो पार्वतीबडोदा गावात दिसून आला. त्यामुळे कुनो व्यवस्थापनाने चित्त्यांवर लक्ष ठेवण्यासाठी आता एक खास श्वानाला पाचारण केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मध्यप्रदेशच्या कुनो राष्ट्रीय उद्यानात चित्यांवर लक्ष ठेवण्यासाठी आता एक खास श्वान पोहोचला आहे. ‘इलू’ असे त्याचे नाव असून, नामिबियातून कुनोत आणलेल्या चित्त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी त्याच्यावर असेल. हा श्वान आता वनाधिकाऱ्यांसह अभयारण्यातील चित्त्यांचा व शिकाऱ्यांचा माग काढेल. श्वानाच्या मदतीने शिकारीच्या प्रकारांना आळा घालता येईल, असे कुनो अभयारण्य प्रशासनाचे म्हणणे आहे. त्याचबरोबर एखादा चिता हरवला तर त्याला शोधण्यासाठीही ‘इलू’ची मदत होईल.

हेही वाचा – वर्धा : तहानलेल्या वन्यप्राण्यांसाठी मनुष्यप्राण्याची जंगलाकडे धाव; टँकर व बैलगाडीने पाणी पुरवठा

हेही वाचा – बापरे..! वाघिणीचा चार बछड्यांसह मुक्तसंचार; रस्ता ओलांडल्यानंतर प्रवाशांचा जीव..

उद्यानात आणलेल्या या श्वानाला पंचकुलात सात महिने विशेष प्रशिक्षण देण्यात आले. हा शोधक श्वान असून, त्याला इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलीस दलाच्या भानू छावणीत प्रशिक्षण देण्यात आले आहे. चित्ते जंगलातून वारंवार बाहेर पडत असल्याने त्यांची सुरक्षा धोक्यात येऊ शकते. त्यामुळे ‘ईलू’ श्वानाची मदत घेतली जाणार आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Another cheetah from kuno went astray and reached the village directly rgc 76 ssb