अंबाझरी तलाव पोहण्यासाठी सुरक्षित नसतानाही येथे पोहायला येणाऱ्या मुलांचा बुडून मृत्यू होण्याच्या घटना काही थांबताना दिसत नाही. रविवारी मित्रांसह पोहण्यास आलेल्या १६ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाला. गेल्या ११ महिन्यांतील ही १४ वी घटना आहे, हे विशेष. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चैतन्य मंगेश डोंगरे (न्यू नंदनवन) हा सीपी करिअर पॉईंट अॅकेडमी येथील आयटीआयचा विद्यार्थी होता. तो दुपारी बारा वाजता शिकवणी वर्ग आटोपून थेट आपल्या चार मित्रांसह अंबाझरी तलावावर फिरायला आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पाण्याच्या काठावर खेळताना त्यांनी पोहण्याचा बेत आखला. काही वेळातच सर्व मुलांनी पाण्यात खेळणे सुरू केले. मात्र, काही वेळातच चैतन्य बुडायला लागला. त्याच्या मित्रांनी आरडओरड केली. मात्र, कुणीही मदतीस धावून आले नाही. त्यामुळे चैतन्यचा मित्रांच्या डोळ्यां-समोरच जीव गेला. तीन तासानंतर आलेल्या अग्निशमन दलाने चैतन्यचा मृतदेह तलावातून बाहेर काढला. याप्रकरणी अंबाझरी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. तलाव हे शहराच्या सौंदर्याचे प्रतीक मानले जाते.

हेही वाचा: अर्धे सत्र संपूनही वसतिगृहातील प्रवेश रखडलेलेच; राज्यातील हजारो विद्यार्थ्यांसमोर अडचणींचा डोंगर

अंबाझरी तलावही त्याला अपवाद नाही. येथे दर शनिवारी-रविवारी या सुटीच्या दिवशी महाविद्यालयीन तरुण-तरुणींची गर्दी होते. पाण्यात पोहण्याचा अनेकांना मोह आवरत नाही. पाण्यात बुडून मृत्यू होतात. वर्षभरात अशा अनेक घटना घडल्या. अशा घटनांबाबत महापालिका आणि पोलीस प्रशासन गांभीर्य दाखवत नाही. त्यामुळे बळींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

हेही वाचा: बुलढाणा: ‘भारत जोडो’ यात्रा २३ ला मध्यप्रदेशकडे प्रस्थान करणार

महापालिका, पोलिसांना गांभीर्य नाही?
एकीकडे फुटाळा आणि सोनेगाव तलावाच्या सौंदर्यीकरणावर कोट्यवधी खर्च करणाऱ्या महापालिकेचे अंबाझरी तलावाच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष आहे. अंबाझरी पोलीससुद्धा नियमित गस्त घालत नाहीत. शनिवार-रविवारी अंबाझरी तलावावर होणारी गर्दी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे अधिक प्रमाण बघता तलावाभोवती सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी अनेकदा करण्यात आली. परंतु, त्याकडे प्रशासन लक्ष देत नाही. त्यामुळे येथे बुडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यानंतरही अंबाझरी तलाव आणखी किती बळी घेणार, असा सवाल नागपूरकर विचारत आहेत.