उपराजधानीतील बहुचर्चित आर्किटेक एकनाथ धर्माजी निमगडे (७२, रा. सेंट्रल ॲव्हेन्यू) हत्याकांडातील आणखी आरोपीला नागपूर पोलिसांनी उत्तर प्रदेशातील आझमगडमधून अटक केली. मोहम्मद परवेज असे आरोपीचे नाव आहे. त्याला हिंगण्यातील दरोडा प्रकरणात नागपूर पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याला न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. यापूर्वी सीबीआयने शार्पशुटर राजा पीओपी ऊर्फ मोहनीश अन्सारी बद्रुद्दीन अन्सारी (रा. छिंदवाडा, मध्यप्रदेश) याला अटक केली होती.

हेही वाचा- ‘तू कामावर गेल्यानंतर आजीचा गळा आवळून खून करणार’ अशी धमकी देत युवकाचा विद्यार्थिनीवर बलात्कार

palghar social worker Ashok Dhodi kidnapped murdered
अशोक धोडी यांचे अपहरण करून हत्या ; वाहनासह मृतदेह बंद दगड खदानीत
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Pune Municipal Corporation contract employee stabbed to death over immoral relationship in Kothrud
कोथरूडमध्ये अनैतिक संबंधातून तरूणाचा खून, पोलिसांकडून संशयित आरोपी ताब्यात
Girl dies after falling from fourth floor of building in Dombivli
डोंबिवलीत इमारतीच्या चौथ्या माळ्यावरून पडून बालिकेचा मृत्यू, विकासकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
Mumbai, Youth murder , Dharavi, murder,
मुंबई : धारावीत तरुणाची हत्या; तिघांना अटक
Toddler killed by water tanker in pune
टँकरच्या चाकाखाली सापडून एक वर्षांच्या बालकाचा मृत्यू
Crime Branch succeeds in arresting two accused in Kanjurmarg murder case Mumbai print news
कांजुरमार्ग येथली हत्येप्रकरणी दोघांना अटक; कांजूर मेट्रो कारशेड परिसरात सापडला होता मृतदेह
accused akshay shinde encounter
अन्वयार्थ : हत्येचा गुन्हा दाखल कराच

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या ६ सप्टेंबर २०१६ रोजी एकनाथ निमगडे यांच्यावर नागपुरातील लाल इमली चौकात आरोपी मोहम्मद परवेज आणि राजा पीओपी या दोघांनी दुचाकीने आल्यानंतर गोळ्या झाडून खून केला. या हत्याकांडाचा तपास नागपूर पोलिसांकडून उच्च न्यायालयाच्या आदेशाने सीबीआयकडे वर्ग करण्यात आला आहे. सीबीआयने २२ डिसेंबर २०२० रोजी तपास बंद करीत प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयापुढे अहवाल सादर केला होता. त्यानंतर काही आरोपींवरील संशय बळावला होता. त्यानुसार सीबीआयने पुन्हा तपासाला सुरुवात केली.

मार्च २०२२ मध्ये गुन्हे शाखा पोलिसांनी कुख्यात मनीष श्रीवास हत्याकांडात कुख्यात गुंड रणजीत सफेलकर, कालू ऊर्फ शरद हाटे, नब्बू ऊर्फ नवाब छोटे साहबसह १३ जणांना अटक केली. चौकशीदरम्यान सफेलकर याने कुण्यातरी राजकीय व्यक्तीकडून पाच कोटी रुपयांची सुपारी घेऊन निमगडे यांची हत्या केल्याची बाब उघड झाली. विमानतळाजवळील साडेपाच एकर भूखंडाच्या वादातून निमगडे हत्याकांड घडल्याचे समोर आले होते. सीबीआयनेही चौकशी केली. मात्र, गोळीबार करणारा सीबीआयला सापडत नव्हता.

हेही वाचा- गडकरींना धमकी देणारा म्हणतोय, ‘आरोप करण्यापूर्वी स्मार्टफोन शोधा आणि सीमकार्ड पण दाखवा’; पोलीस त्रस्त

हत्याकांडाच्या दिवशी परिसरात लागलेल्या सीसीटीव्हीची कसून तपासणी केल्यानंतर राजा पीओपी आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. सीबीआयने मध्यप्रदेशातील नरसिंगपूर येथील कारागृहातून प्रोडक्शन वॉरंटवर त्याला अटक केली. त्यानंतर निमगडे यांच्यावर गोळ्या झाडणारा दुसरा आरोपी सीबीआय शोधत होते. तर दुसरा आरोपी मोहम्मद परवेजला आझमगडवरून नागपूर पोलिसांनी अटक केली.

हेही वाचा- नागपूर : बैरोजगारीची समस्या, रेल्वेतील ड श्रेणी नोकरीसाठी उच्च शिक्षितांची गर्दी

सीबीआयच्या ताब्यात देणार

हिंगण्यात घडलेल्या एका दरोड्यात मो. परवेज याचा समावेश होता. गुन्हे शाखा पोलिसांनी परवेजला आझमगडवरून ताब्यात घेतले. त्याने निमगडेंवर गोळ्या झाडल्याची कबुली पोलिसांना दिली. त्यामुळे पोलीस आयुक्त अमितेश कुमार आणि सीबीआय अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरू असून तीन दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर परवेजला सीबीआयच्या ताब्यात

Story img Loader