नागपूर : आठवडाभरापूर्वी ‘ते’ दोघेही मुक्तपणे फिरत होते, निसर्गाच्या सानिध्यात विहार करत होते, पण अचानक वीज तारा आडव्या आल्या आणि दोघांचाही बळी गेला. गावकरी त्यांचा निष्प्राण देह बघतच राहिले. कुणालाही त्यावर विश्वास नव्हता, पण ते खरे होते. ‘प्रेमाचे प्रतीक’ अशी त्यांची ओळख आहे.

हेही वाचा… नक्षलग्रस्त गडचिरोलीत भांडवलदारांचे राज्य : जयंत पाटील

actress Sapna Singh teen son found dead in UP (1)
मित्रांबरोबर गेला, दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला; प्रसिद्ध अभिनेत्रीच्या १४ वर्षीय मुलाचा दुर्दैवी अंत
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Girl stops talking to family at boyfriend behest Nagpur news
प्रेमासाठी वाट्टेल ते ! प्रियकराच्या सांगण्यावरुन मुलीचा कुटुंबियांशी अबोला
Man who left home after wife death returns home after 15 years
पत्नी विरहातून घर सोडले, १५ वर्षानंतर कुटुंबात परतला; नागपुरातील मेयो रुग्णालयात…
young woman abandoned her newborn near Vanzra Layout Nagpur
अनैतिक संबंधातून जन्मलेल्या बाळाला रस्त्यावर फेकले
Kurla Bus Accident
Kurla Bus Accident : पहिल्या नोकरीचा पहिलाच दिवस, अन् घात झाला…; घरी परतताना १९ वर्षीय तरूणीला मृत्यूने गाठलं
gold from woman dead body s neck was stolen
मृत्यूनंतरही परवड थांबली नाही, पार्थिव रुग्णालयात नेताना महिलेच्या गळ्यातील गंठण चोरीला
Vasai-Virar City Municipal Corporation
प्रभारी आयुक्त रमेश मनाळे यांची समाजमाध्यमावर बदनामी

हेही वाचा… अमरावती : सरपंचपदासाठी मोर्चेबांधणी सुरू; इच्छुकांकडून मतदारांच्या गाठीभेटी

गोंदिया जिल्ह्यात आठवडाभरपूर्वीच सारस पक्ष्यांची एक जोडी विजप्रवाहाने मृत्युमुखी पडली होती. त्याचा तपास पूर्ण होऊन भविष्यातील त्यांचे मृत्यू रोखण्यासाठी प्रयत्न होत नाही तोच शनिवारी पुन्हा एक निमवयस्क सारस पक्षी गंभीर अवस्थेत मिळाला. गोंदिया तालुक्यातील डांगुर्ली गावालगतच्या शेतामध्ये हा पक्षी धडपडताना आढळून आला. जवळच काही अंतरावर काही अन्य पक्षी मृत अवस्थेत मिळालेली आहेत. प्राथमिक अंदाजानुसार, विषबाधेमुळे हा सारस पक्ष अत्यवस्थ झाला असावा, असे वाटते आहे. काही लोक पक्ष्यांची शिकार करण्यासाठी विषबाधा करून पक्षी मारतात, त्याकरिता ते काही ठराविक किटकनाशकांचा (organophosphate groupच्या किटकनाशकांचा) वापर करतात . यावर्षी गोंदिया जिल्ह्यात फक्त तीन सारस पक्ष्यांची घरटी मिळाली व त्यातून चार पिलांचा जन्म झाला. त्यातलेच एक पिल्लू गंभीर अवस्थेत आहे. अशा घटना आणि प्रकार बघता पुन्हा एकदा सारस संरक्षणातकरिता भक्कम तरतूद व उपाययोजना अंमलात आणण्याची गरज मानद वन्यजीव रक्षक सावन बाहेकर यांनी व्यक्त केली आहे.

Story img Loader