लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वाशीम : समृद्धी महा मार्गावरील मालेगाव तालुक्यातील रिधोरा इंटर चेंज जवळ होंडाई क्रेटा कार संभाजीनगर वरून अमरावती कडे जात असताना चालकाला डुलकी लागल्याने गाडीचे नियंत्रण सुटले. कार उभ्या असलेल्या ट्रक क्रमांक एम एच १५ जे सी ९६९५ वर धडकली. धडक एव्हढी जोरदार होती की कार मधीच दोघे जागीच ठार झाले तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी घडली.

प्राप्त माहिती नुसार ट्रक क्र. एम एच १५ जे सी ९६९५ समृद्धी महामार्गवरील रिधोरा इंटर चेंज जवळ रस्त्याच्या कडेला उभा होता. मागील दिशेने अमरावती कडे जात असलेल्या हुंडाई कार चालकाला डूलकी लागून नियंत्रण सुटल्याने उभ्या ट्रकला अतिशय वेगाने मागून धडकली. अपघात एव्हढा भीषण होता की कारचा अर्धा भाग ट्रक च्या मागे घुसला होता.

आणखी वाचा-सिंगापूरच्या धर्तीवर चंद्रपुरात ‘टायगर सफारी’! वनविभागाच्या १५ वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सिंगापूर व दुबई दौरा

यामध्ये कार मधील सादल काजी, आलम हुसेन (कर अधिकारी)हे मयत झाले तर आरिफ खान हे गंभीर जखमी असून त्यांना वैद्यकीय उपचाराकरीता रुग्णवाहिकेच्या मदतीने मालेगाव ग्रामीण रुग्णालय येथे दखल केले असता त्याचाही मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच ए पी आय दांदडे, पीएसआय मोरे व मालेगाव पोलीस स्टेशचे अधिकारी कर्मचारी, रुग्णवाहीका घटनास्थळी दाखल झाले.अपघात ग्रस्त वाहन घटनास्थळ येथून मालेगाव पोलीस स्टेशन येथे आणण्याची प्रक्रिया सुरु होती.

समृद्धी महामार्ग बनतोय धोकादायक

समृद्धी महामार्ग हा राज्य सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट असला तरी हा महामार्ग खुला झाल्यानंतर दररोज अपघाताच्या घटना घडत आहेत. यामध्ये अनेकांचा अपघात होऊन मृत्युच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे प्रवाशी वर्गात चिंता व्यक्त केली जात आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Another terrible accident on samriddhi highway three people were killed pbk 85 mrj