लोकसत्ता टीम

नागपूर : नागझिरा अभयारण्यात सलग दुसऱ्या दिवशी आणखी एका वाघाचा मृतदेह आढळल्याने नागझिरा प्रशासन हादरले आहे. नागझिराचा राजा अशी ओळख असणारा ‘टी-९’ हा वाघ काल मृतावस्थेत सापडला होता. तर आज सकाळी ‘टी-४’ या वाघिणीचा बछडा मृतावस्थेत सापडल्याने खळबळ उडाली आहे.

Farmer killed in tiger attack
वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Two youths died after drowning in a tank in Bhalivali vasai news
भालिवली येथील कुंडात बुडून दोन तरुणांचा मृत्यू
pets cats
पाळीव प्राण्यांच्या विरहाच्या भीतीने नैराश्य, तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
nagpur,tiger,railway,
VIDEO : हे काय ! रेल्वेच्या धडकेत १३ वाघ मृत्युमुखी
wild animals adoption scheme
मुंबई: राष्ट्रीय उद्यानातील वाघ, बिबट्या पालकांच्या प्रतीक्षेत
sahyadri tiger project
१०० किलोमीटरचे अंतर पार करून वाघ सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात…
इयन बोथम आणि मर्व्ह ह्यूज
मैदानावरच्या हाडवैरीने वाचवला मगरींच्या तावडीतून जीव; इयन बोथम यांनी सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग

‘टी-९’ उर्फ ‘बाजीराव’चा मृत्यू कुठे?

नागझिरा अभयारण्यांतर्गत सहवनक्षेत्र नागझिरा संकुल, नियत क्षेत्र नागझिरा एक, कक्ष क्र. ९६ मधील मंगेझरी रोड नागदेव पहाडी परिसरात बिटरक्षक गस्तीवर असतांना साधारणतः सकाळी दहा वाजताच्या सुमारास एक नर वाघ अंदाजे वय वर्षे नऊ ते दहा मृत अवस्थेत दिसून आला.

आणखी वाचा-“पुढचा मुख्यमंत्री विदर्भातीलच,” काँग्रेस नेत्यांचा नाना पटोलेंच्या नावावर…

घटनास्थळी कोण कोण?

‘टी-९’च्या मृत्यूची माहिती मिळताच नवेगाव-नागझिरा क्षेत्रसंचालक तथा उपवनसंरक्षक जयरामे गौडा, उपसंचालक राहूल गवई, सहाय्यक वनसंरक्षक एम.एस. चव्हाण, वनपरिक्षेत्र अधिकारी व्ही. एम. भोसले घटनास्थळी दाखल झाले. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या प्रमाणभूत कार्यपध्दतीनुसार गठीत समितीद्वारे घटनास्थळ परिसराची पाहणी करण्यात आली. या समितीमध्ये मानद वन्यजीव रक्षक सावन बहेकार, मानद वन्यजीव रक्षक रुपेश निंबरते, छत्रपाल चौधरी उपस्थित होते. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ शितल वानखेडे, डॉ सौरभ कबते, डॉ. समिर शेंदरे, डॉ. उज्वल बावनथडे वाघाचे शवविच्छेदन केले.

कोण होता ‘टी-९’?

‘टी-९’ उर्फ ‘बाजीराव’ वयाच्या बाराव्या वर्षी वर्चस्वाच्या लढाईत मरण पावला. बाजीराव हा मूळ ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या कोळसा वन परीक्षेत्रातील वाघ होता. डिसेंबर- २०१६ मध्ये हा वाघ ताडोबावरून वाघांच्या नियमित नैसर्गिक भ्रमण मार्गाने नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या नागझिरा जंगलात स्थलांतर करून आला होता. तब्बल नऊ वर्ष त्याने या जंगलावर आपले अधिराज्य गाजवले. मात्र आज दुसऱ्या नर वाघासोबत झालेल्या झुंजीत नैसर्गिक रीतीने तो मरण पावला.

आणखी वाचा-नाना पटोले म्हणतात, “मी मुख्यमंत्री व्हावे…”

दोन्ही मृत्यू संशयास्पद!

‘टी-९’ उर्फ ‘बाजीराव’ या वाघाचा मृत्यू आपसी लढाईत झाल्याचे सांगण्यात येत असले तरीही त्याचा मृत्यू संशयास्पद असल्याची शंका आहे. त्यापाठोपाठ ‘टी-४’ या वाघिणीच्या बछड्याचा मृतदेह सापडला असून हा मृत्यूदेखील संशयास्पद असल्याची चर्चा आहे. ‘टी-९’ उर्फ ‘बाजीराव’ आणि ‘टी-४’ यांच्या मृत्यूने प्रशासन मात्र हादरले आहे. ‘टी-९’ या वाघाचे सर्व अवयव शाबूत होते.