नागपूर : महाविद्यालयीन तरुण व तरुणींना मोबाईलचे वेड लागले आहे. रस्त्यावरून जातानाही हेडफोन लावून जात असतात. असेच हेडफोन लावून रेल्वे रूळ क्रॉस करीत असताना विद्यार्थिनीला भान न राहिल्याने भरधाव रेल्वेखाली कटुन तिचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच नागपूर लगत डोंगरगाव रेल्वे क्रॉसिंग जवळ घडली.
मृतक विद्यार्थिनी आरती मदन गुरव (१९) ही भंडारा जिल्ह्यातील सातोना या गावची निवासी आहे. हिंगणा तालुक्यातील टाकळघाट येथे मावशीकडे ती वास्तव्याला होती. आरती गुरव डोंगरगाव जवळील वैनगंगा अभियांत्रिकी महाविद्यालयात बिई प्रथम वर्षाला शिक्षण घेत होती.१८ जानेवारी रोजी सकाळी टाकळघाट वरून गुमगाव रेल्वे स्थानकाजवळ एसटीने आली. यानंतर पायदळ रेल्वे स्थानकावर रेल्वे फटका वरून जात होती.यावेळी आरती मोबाईलवर हेडफोन लावून बोलत बोलत जात होती.
हेही वाचा >>> नागपूर : भटक्या श्वानांमुळे नागरिक त्रस्त, महापालिका इतर कामांत व्यस्त!
रेल्वे फटका जवळ रेल्वे रूळ क्रॉस करीत असताना हेडफोन कानात असल्याने तिला कुठलाही आवाज आला नाही. तेवढ्यात येणारी रेल्वे इतर जणांना दिसली. त्यांनी आरडाओरड केली. त्यंनी तिला मोठ्य- मोठ्याने किंचाळून आवाज दिला. मात्र हेडफोन लावून असल्याने तिला कुणाचाही आवाज ऐकू आला नाही. भरधाव आलेली पुणे – नागपूर रेल्वे गाडीच्या च खाली येऊन तिचा मृत्यू झाला.तिला रेल्वे गाडीने ५० फूट पर्यंत फरफटत नेले. घटनास्थळी बघ्याची गर्दी मोठ्या प्रमाणात झाली.घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक वाघ पथकासह दाखल झाले. घटनास्थळी पंचनामा करून शव उत्तरीय तपासणीसाठी हिंगणा ग्रामीण रुग्णालयात पाठविले. या प्रकरणी हिंगणा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.