भंडारा: पवनी तालुक्यात वाघाने आणखी एक बळी गेला घेतला असून एकाच आठवड्यातील ही दुसरी घटना आहे. मृतकाचे नाव ईश्वर सोमा मोटघरे , वय ५८, रा. खातखेडा असे आहे. दरम्यान, आठवडाभरात वाघाच्या हल्ल्याच्या दोन घटनांमुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी वनाधिकाऱ्यांवर हल्ला केला. यात सहायक वनसंरक्षक यशवंत नागुलवार, वनपाल वावरे आणि गुप्ता गंभीर जखमी झाले.

यापूर्वी २३ जून रोजी पवनी तालुक्यातील गुडेगाव येथे याच वाघाने पहिला बळी घेतला होता. या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये रोष होता. अशातच, त्याच वाघाने खातखेडा एसटी बसस्थानकावर आणखी एका गावकऱ्याचा बळी घेतला. यामुळे गावकऱ्यांचा संताप अनावर झाला.

Farmer killed in tiger attack
वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Two youths died after drowning in a tank in Bhalivali vasai news
भालिवली येथील कुंडात बुडून दोन तरुणांचा मृत्यू
pets cats
पाळीव प्राण्यांच्या विरहाच्या भीतीने नैराश्य, तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
nagpur,tiger,railway,
VIDEO : हे काय ! रेल्वेच्या धडकेत १३ वाघ मृत्युमुखी
second phase of tiger migration is complete with another tigress captured from Tadoba
दुसरी वाघीणही महाराष्ट्रातून पोहोचली ओडिशात…आंतरराज्यीय स्थलांतर अखेर…
wild animals adoption scheme
मुंबई: राष्ट्रीय उद्यानातील वाघ, बिबट्या पालकांच्या प्रतीक्षेत

हेही वाचा… तलाठी भरतीची जाहिरात येताच दलाल सक्रिय? पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह

घटनास्थळी दाखल झालेल्या सहायक वनसंरक्षक नागुलवार, वनपाल वावरे आणि गुप्ता यांना ग्रामस्थांच्या रोषाला सामोले जावे लागले. ग्रामस्थांनी त्यांच्यावर हल्ला केला. यात तिन्ही अधिकारी गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात प्रथमोपचार केल्यानंतर नागपुरातील खासगी इस्पितळात हलवण्यात आले