आरटीओ’ लाच प्रकरणात दुसरा आरोपी भोयर अटकेत

महेश बोकडे, लोकसत्ता

नागपूर : काँग्रेसचे आमदार डॉ. वजाहत मिर्झा यांच्या नावाने नागपूरच्या आरटीओ अधिकाऱ्याकडून २५ लाख रुपये लाच घेणारा दुसरा आरोपी शेखर भोयरला लाचलुचपत प्रतिबंध विभागाने (एसीबी) इंदूरहून अटक केली आहे. परंतु, संशयास्पद भूमिका असलेल्या आमदाराला चौकशीलाही बोलावले जात नसल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग डॉ. मिर्झांवर कृपादृष्टी का दाखवत आहे, हा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे.

Commissioner Shekhar Singh orders closure of RO project in Pimpri pune news
अखेर पिंपरीतील ‘आरओ’ प्रकल्प बंद; आयुक्तांचा आदेश
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Meet the citizens every Tuesday-Wednesday Commissioners circular
दर मंगळवार- बुधवारी नागरिकांना भेटा, आयुक्तांचे परिपत्रक
Violation of High Court order servant stopped from feeding stray dogs
उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन, भटक्या श्वानांना खाद्य देण्यापासून सेवकाला रोखले
former mla subhash zambad news in marathi
माजी आमदार सुभाष झांबड यांची सर्वोच्च न्यायालयात धाव; अटकपूर्व जामिनासाठीचा विशेष अर्ज मागे
Police inspector beaten up by beat marshal case registered against both
पोलीस निरीक्षकाला बीट मार्शलकडून मारहाण, दोघांवरही गुन्हा दाखल; शासकीय कामात…
cm Devendra fadnavis marathi news
Supriya Sule : राज्य सरकारवर खासदार सुप्रिया सुळेंचा गंभीर आरोप, म्हणाल्या…!
citizens affected by garbage fires in kolhapur
कोल्हापुरात कचरा आगीने त्रस्त नागरिकांकडून संताप; प्रशासक धारेवर, पालकमंत्र्यांचीही भेट

हेही वाचा >>> रावसाहेब दानवे यांच्या विरोधात काँग्रेसचे कल्याण काळे रिंगणात ?

मिर्झांच्या नावाने आरटीओकडून पहिल्या टप्प्यात २८ मार्चला २५ लाख रुपये लाच स्वीकारण्याच्या प्रकरणात दिलीप खोडे आणि शेखर भोयर या दोन्ही आरोपींचा थेट संबंध आहे. रविभवनच्या खोली क्रमांक ४५ मध्ये लाच घेताना खोडे याला ‘एसीबी’कडून अटक झाली, परंतु भोयर तेथून पसार झाला होता. ‘एसीबी’च्या २८ मार्चच्या सापळ्यापूर्वी रविभवनमध्ये मिर्झा यांच्या नावाने आरक्षित खोलीत दोन्ही आरोपी, आरटीओ अधिकाऱ्यासोबत आमदार डॉ. मिर्झा चर्चेत सहभागी झाले होते. दरम्यान, आमदार डॉ. मिर्झा सातत्याने मुख्य आरोपी दिलीप खोडेला ओळखत नसून भोयरशी केवळ परिचय असल्याचा दावा करत होते. रवी भवनला कुणाही सोबत बैठक झाली नसल्याचाही मिर्झांचा दावा आहे.

भोयरला १० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

३० मार्चच्या संध्याकाळी भोयर विमानाने जयपूरला पोहोचला. तेथून त्याने उदयपूर आणि नंतर इंदूर गाठले. इंदूरच्या एका हॉटेलमध्ये लपला असताना एसीबीने त्याला अटक केली. त्याला नागपुरातील न्यायालयात हजर केले असता १० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. भोयरकडून बरीच माहिती मिळण्याची शक्यता आहे.

भोयरने मोबाईल लपवून ठेवला

लाचखोर शेखर भोयरने स्वत:चा मोबाईल लपवून ठेवला आहे. अद्यापही एसीबीच्या हाती मोबाईल नसल्याने तपासात अडचणी येत आहेत. त्यामुळे चौकशीदरम्यान भोयरकडून मोबाईलबाबत माहिती मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. तर दुसरीकडे ‘एसीबी’च्या पथकांनी भोयरच्या निवासस्थानासह वेगवेगळ्या ठिकाणी छापे मारून आणखी माहिती मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

एसीबीकडून पारदर्शक चौकशी

‘एसीबी’ने दुसरा आरोपी शेखर भोयरला अटक केली असून त्याच्याकडूनही लाच प्रकरणाची सविस्तर माहिती मिळवण्याचा प्रयत्न आहे. आवश्यक पुरावे हाती आल्यावर या प्रकरणातील सगळ्याच दोषींवर कठोर कारवाई होईल. कुणावरही कृपादृष्टीचा प्रश्नच नाही. एकही आरोपीला सुटू दिले जाणार नाही.

– राहुल माखणीकर, पोलीस अधीक्षक, एसीबी.

Story img Loader