मेडिकलमधील रॅगिंग प्रकरणाने सोमवारी नवीन वळण घेतले. येथील इंटर्नशिप रद्द झालेल्या विद्यार्थ्यांवरील कारवाईबाबत निर्णय घेण्याचा अधिकार मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मेडिकलच्या रॅगिंग विरोधी समितीला सोपवला. त्यावरून समितीने सर्वांना पुन्हा इंटर्नशिप बहाल केली. परंतु त्यांच्यावरील वसतिगृहातील प्रतिबंध मात्र कायम ठेवले.

हेही वाचा >>>नागपूर: धीरेंद्र महाराज, दिव्यशक्ती सिद्ध करून दाखवा! प्रा. श्याम मानव यांचे खुले आव्हान

PM Vidyalakshmi Scheme
उच्च शिक्षण घेऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांना मिळणार १० लाखांपर्यंत शैक्षणिक कर्ज; काय आहे ‘पंतप्रधान विद्यालक्ष्मी योजना’?
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
BJP Party Worker Dead Body Found in Office
BJP Worker : भाजपा कार्यकर्त्याचा रक्ताने माखलेला मृतदेह कार्यालयात सापडल्याने खळबळ, महिला अटकेत; कुठे घडली घटना?
Loksatta explained What is the reason for the dissatisfaction of gig workers
‘गिग’ कामगारांनी साजरी केली ‘काळी दिवाळी’! त्यांच्या असंतोषाचे कारण काय? सामाजिक सुरक्षेचा लाभ किती?
10th student commits suicide before pre-examination
पूर्वपरीक्षेपूर्वी दहावीतील विद्यार्थिनीची आत्महत्या
TET, AI, TET malpractices, TET news, TET latest news,
‘टीईटी’वर आता एआय ठेवणार नजर… गैरप्रकार रोखण्यासाठीच्या उपाययोजना काय?
construction worker dies after gets trapped in jcb machine
जेसीबी यंत्राखाली सापडून बांधकाम मजुराचा मृत्यू
Controversial statement, Kunbi, political atmosphere, Wani yavatmal
वणी : न घडलेल्या प्रकाराने राजकीय वातावरण ढवळून निघाले; कुणबी समजाबद्दलच्या वक्तव्यात बोलविता धनी कोण?

मेडिकल प्रशासनाने याप्रकरणी चौकशी करून मेडिकलच्या सहा विद्यार्थ्यांची इंटर्नशिप रद्द करून त्यांची वसतिगृहातूनही हकालपट्टी केली गेली होती. दरम्यान, चित्रफीतीत न दिसणाऱ्या सहापैकी ३ विद्यार्थ्यांनी या प्रकरणात उच्च न्यायालयाचे दार ठोठावले. न्यायालयात वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी रॅगिंग झाले नसल्याचेही लेखी दिले. परंतु न्यायालयाने दोन्ही बाजू जाणून कारवाईचा निर्णय मेडिकलमधील रॅगिंग विरोधी समितीवर सोपवला.

हेही वाचा >>>नागपूर: भारतीय विज्ञान काँग्रेसमध्ये आध्यात्मिक लोकांचा वावर वाढतोय! शास्त्रज्ञ डॉ. विवेक अंबाडे यांची खंत

समितीची बैठक सोमवारी झाली. यावेळी सहाही विद्यार्थ्यांना बोलावून त्यांचे म्हणणे पुन्हा ऐकण्यात आले. त्यांच्याकडून पुढे अनुचित प्रकार घडणार नसल्याचे लेखी घेत इंटर्नशिप बहाल केली गेली. परंतु इंटर्नशिपवरून काढल्यापासूनच्या अतिरिक्त कालावधीसाठी त्यांना पुन्हा इंटर्नशिप करावी लागणार आहे. सगळ्यांवर वसतिगृहात प्रतिबंध मात्र कायम ठेवण्यात आला असून या भागात दिसल्यास कारवाईची तंबी देण्यात आली आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयासह त्यावर समितीने घेतलेल्या निर्णयाची माहिती आता महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठासह राष्ट्रीय रॅगिंग समितीलाही दिली जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. या वृत्ताला मेडिकलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे.