नागपूर : दक्षिण नागपुरातील सोमवारी कॉटरमधील कामगार केंद्राच्या इमारतीत असामाजिक तत्त्वाचा वावर वाढल्याने परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहे.
कामगार कल्याण केंद्र गेल्या कित्येक वर्षांपासून बंद आहे. येथील इमारत पडक्या स्थितीमध्ये आहे. रात्रीच्या वेळेला येथे असामाजिक तत्त्व गांजा दारू पितात, येथे घाण करतात. या इमारतीमध्ये संपूर्ण अस्वच्छता असून येथील स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. रात्रीच्या वेळेला येथील स्थानिक महिला बाहेर पडायलासुद्धा घाबरतात.
इमारतीवर असामाजिक तत्त्वाच्या लोकांनी अनाधिकृत ताबा घेतला आहे. दरम्यान या संदर्भात शिवसेनेच्या जिल्हा संघटिका मनीषा पापडकर यांनी संबंधित विभागाला निवेदन देऊन इमारतीमध्ये बाल संगोपन केंद्र किंवा अंगणवाडी सुरू करावी, अशी मागणी केली.