नागपूर : टोल आकारणीवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. नागपूर जिल्ह्यात खापा येथे टोल वसुलीच्या विरोधात आंदोलन करण्याची घोषणा मनसेकडून करण्यात आली होती. मात्र ऐनवेळी आंदोलन रद्द करण्यात आले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा टोल वसुलीचा मुद्दा उपस्थित करीत ही सर्वसामान्य जनतेची लूट असल्याचा व हे एक स्कॅम असल्याचा आरोप सोमवारी केला होता. हे आरोप करताना त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याचा दाखला दिला होता.

फडणवीस यांनी महाराष्ट्रात मोटारगाड्या व छोट्या वाहनांकडून पथकर वसूल केला जात नाही, असा दावा केला होता. मनसेने हे धादांत खोटे असल्याचा आरोप करीत टोल वसुलीला विरोध करीत  आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार नागपूर जिल्हा मनसेने मंगळवारी दहा ऑक्टोबरला खाप्याजवळील वेळाहरी टोलनाक्यावर आंदोलन करण्याची घोषणा केली होती. मात्र आज अचानक हे आंदोलन रद्द करण्यात आल्याचे मनसेचे जिल्हाध्यक्ष आदित्य दुरुगकर यांनी कळविले. त्यामुळे तर्कवितर्क लावले जात आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काय म्हणतात मनसे जिल्हाध्यक्ष

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे १० ऑक्टोबरला टोल नाका वेळाहरी खापा येथे होणारे आदोलंन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशावरुन व पक्षाचे नेते बाळा नादंगावकर  यांच्या सुचनेनुसार रद्द करण्यात आले आहे.असे मनसेचे जिल्ह्याध्यक्ष आदित्य दुरुगकर यांनी कळविले आहे.