अकोला : अकोला लोकसभा मतदारसंघात सलग पाचव्यांदा कमळ फुलले आहे. भाजप व काँग्रेसमध्ये झालेल्या अटीतटीच्या लढतीत अखेर भाजप उमेदवार अनुप धोत्रे यांनी बाजी मारली. त्यांनी काँग्रेसचे डॉ. अभय पाटील यांचा ४० हजार ६२६ मतांनी पराभव केला. वंचित आघाडीचे ॲड. प्रकाश आंबेडकर यांची तिसऱ्या स्थानावर घसरण झाली.

अकोला मतदारसंघात भाजपचे अनुप धोत्रे, काँग्रेसचे डॉ. अभय पाटील व वंचित आघाडीचे ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्यात तिरंगी लढत झाली. गेल्या दोन दशकांपासून अकोला मतदारसंघावर भाजपचे वर्चस्व राखणारे संजय धोत्रे प्रकृती अस्वस्थामुळे सक्रिय राजकारणापासून दूर आहेत. त्यामुळे भाजपने त्यांचे पूत्र अनुप धोत्रे यांना उमेदवारी देऊन निवडणुकीच्या मैदानात उतरवले होते. काँग्रेसने नवा चेहरा म्हणून मराठा समाजाचे डाॅ. अभय पाटील यांना उमेदवारी दिली. ॲड. प्रकाश आंबेडकर अकराव्यांदा अकोल्यातून रिंगणात होते. या प्रमुख तीन उमेदवारांमध्ये तुल्यबळ लढत झाली.

maharashtra vidhan sabha election 2024 sanjay kelkar avinash jadhav rajan vichare thane assembly constituency
लक्षवेधी लढत : ‘शिवसेना- ठाणे’ समीकरण अडचणीत?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Chembur Marwari Chawl, citizens vote vidhan sabha boycott, vote boycott, rehabilitation,
मुंबई : दीड हजार नागरिकांचा मतदानावर बहिष्कार
belapur assembly constituency sandeep naik vs manda mhatre maharashtra vidhan sabha election
लक्षवेधी लढत: भाजपच्या आमदार पुत्राचेच पक्षाला आव्हान
Kalyan Dombivli assembly election campaign wage rates labour
कल्याण-डोंबिवलीत प्रचार टिपेला, मजुरीचे दर शिगेला; प्रचारासाठी लागणाऱ्या मजुरांचे दर २५० ते १२०० रूपये
Jharkhand Assembly Election 2024 Phase 1 Voting Updates in Marathi
Jharkhand Assembly Election 2024 : झारखंडमध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत ५९ टक्के मतदान
Rishikesh Patel and Atmaram Patel focus on Amravati election
गुजरातच्‍या ‘पटेलां’चे अमरावतीच्‍या निवडणुकीवर लक्ष !

हेही वाचा… Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : नितीन गडकरी यांनी नातवंडासह केला जल्लोष

२६ एप्रिलला मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर मंगळवारी सकाळी ८ वाजतापासून शिवणी येथील गोदामात मतमोजणीला सुरुवात झाली. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून भाजपचे अनुप धोत्रे व काँग्रेसचे अभय पाटील यांच्यात सामना रंगला. पहिल्या फेरीपासून अभय पाटील यांनी घेतलेली आघाडी १४ व्या फेरीपर्यंत कायम होती. १४ व्या फेरीपर्यंत नऊ हजार ०७४ मतांनी डॉ. अभय पाटील आघाडीवर होते. १५ व्या फेरीत मात्र चित्र पालटले. या फेरीमध्ये अनुप धोत्रे यांनी प्रथमच एक हजार ९५४ मतांनी आघाडी घेतली. त्यानंतर प्रत्येक फेरीमध्ये अनुप धोत्रे यांचे मताधिक्य वाढतच गेले. मतदान यंत्रातील एकूण २८ फेऱ्यांच्या मतमोजणीमध्ये अनुप धोत्रे यांनी ४० हजार ०१२ मतांची निर्णायक आघाडी घेतली. टपाली मतपत्रिका मिळून अनुप धोत्रे यांना चार लाख ५७ हजार ०३० मते पडली, तर त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेस उमेदवार डॉ. अभय पाटील यांना चार लाख १६ हजार ४०४ मते मिळाली. ४० हजार ६२६ मतांनी अनुप धोत्रे यांनी अभय पाटील यांचा पराभव केला. ॲड. प्रकाश आंबेडकर यांना दोन लाख ७६ हजार ७४७ मतांवर समाधान मानावे लागले. ते तिसऱ्या स्थानावर घसरले. पाच हजार ७८३ मतदारांनी नोटा पर्यायाचा वापर केला. निवडणूक निर्णय अधिकारी अजित कुंभार यांच्या मार्गदर्शनात मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पडली.

१५ व्या फेरीनंतर चित्र बदलले

मतमोजणीमध्ये एक ते १४ फेरीदरम्यान काँग्रेस व भाजपमध्ये तुल्यबळ लढत झाली. त्यात काँग्रेसने आघाडी घेतली होती. त्यामुळे काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढला होता. मात्र, १५ व्या फेरीनंतर संपूर्ण चित्र बदलले. या फेरीमध्ये प्रथमच भाजपने आघाडी घेतली. त्यानंतर सर्वच फेऱ्यांमध्ये भाजप आघाडीवर राहिला. अखेर अनुप धोत्रे यांनी अभय पाटील यांना पराभूत केले. भाजप कार्यकर्त्यांनी विजयी जल्लोष केला.

हेही वाचा… Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : नितीन गडकरींना पंतप्रधान करा, निवासस्थानापुढे कार्यकर्त्यांच्या घोषणा

२०१९ च्या तुलनेत भाजपचे मताधिक्य घटले

अकोला मतदारसंघातील वर्चस्व भाजपने कायम राखले असले तरी मताधिक्यात मोठी घसरण झाली आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत संजय धोत्रे यांनी दोन लाख ७५ हजार ५९६ विक्रमी मतांनी ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा पराभव केला होता. या निवडणुकीत भाजप व काँग्रेसमध्ये अटीतटीची लढत झाली. त्यामध्ये अनुप धोत्रे यांनी ४० हजार ६२६ मतांनी विजय मिळवला.