महेश बोकडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर : नागपुरात करोना नियंत्रणात असतानाच मंगळवारी २४ तासांत जिल्ह्यात तब्बल २५ नवीन रुग्णांची भर पडल्याने चिंता वाढली आहे. नवीन रुग्णांमध्ये नागपूर शहरातील १५, ग्रामीणमधील ७, जिल्ह्याबाहेरील ३ अशा एकूण २५ रुग्णांचा समावेश आहे. शहरातील रुग्णांमध्ये लक्ष्मीनगर झोनमधील वस्तीतील २, धरमपेठ झोन २, हनुमाननगर झोनचे १, सतरंजीपुरा झोनचे २, मंगळवारी झोनच्या ६ रुग्णांचा समावेश आहे.  ४ रुग्ण हे मुंबईला, १ दुबईला, १ पटणा, १ अंनगाव सुर्जी येथे जाऊन आले आहे. बाधितांच्या संपर्कातील नागरिकांची माहिती घेतली जात आहे. रुग्णवाढीमुळे जिल्ह्यात करोना संक्रमण वाढते काय? याकडेही लक्ष लागले आहे. दरम्यान, या सर्व नवीन रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे असून सगळ्यांची प्रकृती स्थिर असल्याचा महापालिकेच्या आरोग्य विभागाचा दावा आहे.

९४ वर्षीय वृद्धालाही करोना

नवीन रुग्णांमध्ये एका ९४ वर्षीय वृद्धासह एका ६४ वर्षीय वृद्धेचा समावेश आहे. या दोघांच्याही काही तपासण्या करण्यात आल्यावर त्यांना गृहविलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

दोन पोलीस कर्मचाऱ्यांनाही करोना

नवीन करोनाग्रस्तांमध्ये दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यापैकी एक गिट्टीखदान ठाण्यातील आणि एक मुख्यालयातील कर्मचाऱ्याचा समावेश आहे.

सक्रिय रुग्णसंख्या ५३ वर

नवीन रुग्णांच्या तुलनेत २४ तासांत शहरात १, ग्रामीणला १, जिल्ह्याबाहेरील ३ असे एकूण ५ व्यक्ती करोनामुक्त झाले. त्यामुळे मंगळवारी शहरात ३४, ग्रामीणला १८, जिल्ह्याबाहेरील १ असे एकूण ५३ सक्रिय (उपचाराधीन) करोनाग्रस्त नोंदवले गेले.