नागपूर : जिल्ह्यात २४ तासांत १३८ नवीन करोनाग्रस्त आढळले. एकीकडे रुग्ण वाढत असतानाच रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्याही आठ दिवसांत २० वर गेल्याने चिंता वाढली आहे. नागपूर जिल्ह्यात १ जुलैला गंभीर रुग्णांची संख्या १३ होती.८ जुलैला ती २० वर गेली. एकूण दाखल रुग्णांपैकी ९ रुग्ण मेडिकल, १ मेयो, २ किंग्जवे रुग्णालय, १ वोक्हार्ट रुग्णालय, १ सेंट्रल क्रिटिकल केअर, १ ऑरेंज सिटी रुग्णालय, १ स्टार सिटी रुग्णालय, १ रेल्वे रुग्णालय, ३ मेडिट्रिना रुग्णालयात उपचार घेत आहेत.दरम्यान, दिवसभरात शहरात १०९, ग्रामीणला २९ असे एकूण १३८ नवीन करोनाग्रस्त आढळले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सक्रिय रुग्णसंख्या ७१८

शुक्रवारी शहरात सक्रिय रुग्णसंख्या ५०८, ग्रामीण मध्ये  २१० अशी एकूण ७१८ रुग्ण एवढी नोंदवली गेली. सकारात्मक अहवालाचे प्रमाण ६ टक्केहून अधिक दिवसभरात १ हजार ४२४, ग्रामीणला ८१२ अशा एकूण २ हजार २२६ संशयितांची चाचणी झाली. त्यातील १३८ रुग्णांमध्ये करोनाचे निदान झाले. चाचण्यांच्या तुलनेत सकारात्मक अहवालाचे प्रमाण ६.१७ टक्के आहे. शहरातील प्रमाण ७.६५ टक्के तर ग्रामीणमध्ये  ५.५७ टक्के आहे.