लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नागपूर : मध्य रेल्वेने एका एजन्सीसोबत करार करून नागपूर रेल्वे स्थानकावर ॲप-आधारित टॅक्सी चालकांना प्रवासी घेण्यासाठी स्थानकापर्यंत येण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे प्रवाशांना नागपूर रेल्वे स्थानकावरून वाहनात बसवण्याची (पिक-अप) सुविधा उपलब्ध होणार आही. याची सुरुवात उद्या, बुधवारपासून होत आहे.

रेल्वे प्रशासनाने यापूर्वी कार, ऑटोरिक्षा, टॅक्सी चालकांना प्रवाशांना स्थानकावर सोडण्यास परवानगी दिली होती. त्या वाहनांसाठी स्वतंत्र मार्गिका उपलब्ध केली. पण टॅक्सी चालकांना स्थानकावरून प्रवासी घेण्यास (पीक-अप) मनाई होती. परिणामी प्रवाशांना स्थानकापासून सुमारे एक किलोमीटरचे अंतर पायी चालत जावून टॅक्सी घ्यावी लागत असे. यामध्ये सर्वांधिक अडचण वयोवृद्ध आणि महिला आणि बालकांची होत होती. आता प्रवाशांना घेण्यास आणि सोडण्यास येणाऱ्यांच्या वाहनांची समस्या दूर होणार आहे. रेल्वे प्रशासनाने नागपूर स्थानकावर ॲप-आधारित टॅक्सी सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

आणखी वाचा-कापूस पणन महासंघ निवडणूक : प्रसेनजीत पाटील यांचा एकतर्फी विजय

मात्र, रेल्वे स्थानकाच्या परिसरातून टॅक्सी बुक करताना प्रवास भाड्याव्यतिरिक्त ५० रुपये अतिरिक्त शुल्क आकारले जाणार आहे. रेल्वे प्रशासनाने एग्रीगेटर या एजन्सीसोबत करार केला आहे. तर ओला, उबर आणि ओवी टॅक्सी यासारख्या कंत्राटदार आणि ऑपरेशनल ॲप-आधारित टॅक्सी आणि एग्रीगेटर यांनी करार केला आहे. नागपूर रेल्वे स्थानक परिसरात टॅक्सी एग्रीगेटर सेवांना नवीन प्रस्तावित जागा देण्यात आली आहे. ही जागा एस्केलेटरच्या जवळ आणि आरपीएफ ठाण्यापासून पुढे १४६.४० चौरस मीटर क्षेत्रफळावर आहे. यापूर्वी स्थानकाच्या हेरिटेज इमारतीच्या समोर, मार्गिका क्रमांक २ केवळ चारचाकी (ड्रॉप अँड गो) वाहनासाठी निश्चित करण्यात आली आहे. तर मार्गिका क्रमांक ३ ऑटोरिक्षा, टॅक्सी आणि चारचाकी (कार)साठी आहे.

रेल्वे स्थानकासमोर उभ्या असलेल्या खासगी वाहनांमुळे अनेकदा मोठी वाहतूक कोंडी होत असे. वाहनांच्या गर्दीमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. तसेच ही वाहने स्थानक परिसरात फिरणाऱ्या प्रवाशांसाठीही डोकेदुखी ठरत आहे. तथापि, ॲप-आधारित टॅक्सी सेवांच्या अंमलबजावणीनंतर या समस्येचे प्रभावीपणे निराकरण होईल आणि स्थानक परिसरात प्रवाशांना वाहनांचा त्रास होणार नाही, असा दावा रेल्वे अधिकाऱ्यांचा आहे.

आणखी वाचा-मोठी बातमी! सुनील केदार यांच्या शिक्षेला स्थगिती, जामीनही मंजूर

५० रुपये अतिरिक्त का?

ॲप-आधारित कॅब चालकांना रेल्वे स्थानकावरून प्रवासी बसवण्याची (पीक-अप) परवानगी आहे. विमानतळावर कॅबमध्ये बसल्यास प्रवास भाड्या व्यतिरिक्त ज्याप्रमाणे १०० रुपये शुल्क घेतले जाते. त्याप्रमाणे नागपूर स्थानकावरून कॅबमध्ये बसणाऱ्या प्रवाशांना ५० रुपये अतिरिक्त द्यावे लागेल, असे मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक आशुतोष श्रीवास्तव यांनी सांगितले.