अमरावती : दिवाळीत नागरिकांनी सार्वजनिक मैदानांमध्ये जाऊन फटाके फोडावेत असे आवाहन महापालिकेने केले आहे. त्यासाठी झोननिहाय मैदान उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
शहरातील हवा प्रदूषणमुक्त राहावी या उद्देशातून सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांकडून फटाके फोडण्यासाठी सार्वजनिक मैदानांत व्यवस्था करण्यास सांगण्यात आले आहे. त्यानुसार महापालिकेने पाच झोनमध्ये स्वतंत्र मैदानांची व्यवस्था केली आहे. नागरिकांनी घरासमोर फटाके न फोडता सार्वजनिक मैदानात जाऊन फटाके फोडावे व शहर प्रदूषणमुक्त ठेवण्यास सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका आयुक्त देविदास पवार यांनी केले आहे.
हेही वाचा – वर्धा : बुडून मृत्यू नव्हे तर खूनच असल्याचे उघड; मुलानेच बापास…
फटाके फोडण्यासाठी झोन क्र. १ रामपुरी कॅम्प वाघमारे चौक नवसारी, जयसिताराम नगर जवळचे मैदान. झोन क्र. २, राजापेठ दसरा मैदान, अंबिका नगर झोन क्र ३. दस्तूर नगर छत्री तलाव उद्यानासमोरील मैदान, कलोती नगर खुली जागा. झोन क्र ४ बडनेरा गणेश नगर खुले मैदान, सावता मैदान जुनी वस्ती. झोन क्र ५ भाजीबाजार झोन कार्यालयासमोरील खुली जागा, आनंद नगर चौक, वल्लभ नगर, आदिवासी होस्टेलसमोरील जागा निश्चित करण्यात आली आहे.