नागपूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ चे शुद्धिपत्रक जाहीर करून ज्या मराठा उमेदवारांनी अराखीव (खुला) अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल (ईडब्ल्यूएस) प्रवर्गातून अर्ज केला असेल त्यांना सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गातून (एसईबीसी) नव्याने अर्जाची मुभा दिली होती. मात्र, यानंतरही केवळ ८ हजार ३०८ उमेदवारांनीच ‘एसईबीसी’ प्रवर्गातून नव्याने अर्ज केल्याने अद्यापही हजारो मराठा उमेदवारांचे अर्ज हे ‘ईडब्ल्यूएस’ प्रवर्गातच आहेत.

मराठा समाजाला स्वतंत्र १० टक्के आरक्षण मिळाल्यामुळे त्यांना ‘ईडब्ल्यूएस’ आरक्षणाचा लाभ घेता येणार नसल्याने भविष्यात मोठा कायदेशीर पेच निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्य शासनाने फेब्रुवारी २०२४ मध्ये मराठा आरक्षणाचा कायदा केला. परंतु, आरक्षण लागू होण्याआधी ‘एमपीएससी’च्या अनेक जाहिराती प्रसिद्ध झाल्या होत्या. आता या सर्व जाहिरातींमध्ये ‘एसईबीसी’ आरक्षण लागू करून शुद्धिपत्रक काढण्यात येत आहेत.याचाच भाग म्हणून ‘एमपीएससी’ने संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ साठी ९ मे रोजी शुद्धिपत्रक काढून त्यामध्ये ‘एसईबीसी’ आरक्षण लागू केले.

pankaja munde manoj jarange
पंकजा मुंडेंच्या विधान परिषदेच्या उमेदवारीला मनोज जरांगेंचा विरोध? सूचक वक्तव्य करत म्हणाले…
Manoj Jarange patil
“ओबीसी नेते नालायक असूनही…”, मनोज जरांगेंचा हल्लाबोल; मराठा तरुणांना आवाहन करत म्हणाले…
Decision to leave a special train from Vidarbha to Pandharpur for Ashadhi Ekadashi Yatra
गडकरींची रेल्वे मंत्र्यांना विनंती अन् वैदर्भीयांची पंढरी वारी झाली….
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
Two minor girls who came for the exam were molested by the old house owner
परिक्षेसाठी दोन अल्पवयीन मुली नागपुरात आल्या; ८० वृद्ध घरमालकाने अश्लील चाळे करून…
devendra fadnavis analysis
“आपण तीन नाही, तर चार पक्षांशी लढत होतो, तो चौथा पक्ष म्हणजे…”; देवेंद्र फडणवीसांकडून लोकसभेतील निकालाचं विश्लेषण!
South African fans object to Surya's catch
सूर्यकुमार यादवच्या ‘कॅच’वरुन पेटला नवा वाद, दक्षिण आफ्रिकन चाहत्याने VIDEO शेअर करत केला फसवणूक झाल्याचा दावा
Rohit Sharma Statement on India Win
IND vs ENG: टीम इंडियाच्या फायनल प्रवेशासह रोहित शर्माचे विराट कोहलीवर मोठे वक्तव्य; म्हणाला, “१५ वर्ष खेळलेल्या…”

हेही वाचा >>>मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? विचारताच पंकजा मुंडे म्हणाल्या…

भविष्यातील धोका काय?

‘एमपीएससी’चा अभ्यासक्रम बदलण्याआधी नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ ही शेवटची बहुपर्यायी राज्यसेवा परीक्षा राहणार आहे. मराठा उमेदवारांना ‘एसईबीसी’ हे १० टक्के आरक्षण लागू झाल्याने त्यांना ‘ईडब्ल्यूएस’मधून आरक्षण घेता येणार नाही. त्यामुळे ‘एमपीएससी’च्या पूर्व परीक्षेनंतर ‘ईडब्ल्यूएस’ प्रवर्गातून ‘एसईबीसी’ उमेदवारांनी लाभ घेतला असा आक्षेप न्यायालयात करून त्यांना ‘ईडब्ल्यूएस’मधून बाहेर काढा असा दावा केला जाऊ शकतो.

मराठा समाजाला ‘एसईबीसी’ १० टक्के आरक्षण लागू झाल्यापासून ते ‘ईडब्ल्यूएस’मधून बाहेर झाले. त्यामुळे मराठा उमेदवारांना ‘ईडब्ल्यूएस’ आरक्षण लागू होऊच शकत नाही.- अॅड. फिरदौस मिर्झा, ज्येष्ठ अधिवक्ता.

आम्ही या संपूर्ण प्रकरणावर कायदेशीर सल्ला मागितला आहे. आयोग विद्यार्थ्यांसोबत असून कायम त्यांच्या हिताचा विचार करणार आहे. कुणाचेही नुकसान होणार नाही अशीच आयोगाची भूमिका राहिल.- डॉ. सुवर्णा खरात, सचिव, एमपीएससी.