नागपूर: केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालय, वित्तीय सेवा विभाग अंतर्गत रिक्त पदांकरिता भरतीचे आयोजन करण्यात आले आहे. याठिकाणी कनिष्ठ लेखाधिकारी पदाच्या जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १ नोव्हेंबर आहे. तसेच या पदांसाठी शैक्षणिक पात्रता वित्त मंत्रालयाच्या अधिकृत अधिसूचनेनुसार आवश्यक आहे.

हेही वाचा… पुजारीटोला आणि कालिसराड धरणावर सुरक्षा रक्षकच नाही!

या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज दिलेल्या नमुन्यात परिपूर्ण भरलेला असावा. उमेदवारांनी अर्ज जाहिरातीत दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावे. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडावी. अर्ज करण्याची शेवटची तारीख १ नोव्हेंबर २०२३ आहे. अधिकृत वेबसाईट financialservices.gov.in ही असून यावर अधिक माहिती पाहता येणार आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Applications are invited for jobs in the ministry of finance of central government nagpur dag 87 dvr