वाशीम : बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर जिल्हा परिषद अंतर्गत गट क संवर्गातील विविध १८ प्रकारातील २४२ पदासाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. त्याकरीता १२ हजार ३५२ अर्ज प्राप्त झाले असून परिक्षा शुल्कातून अंदाजे १ कोटी १८ लाख रुपयाचा महसूल जमा झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वाशीम जिल्हा परिषदेत विविध पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यामध्ये आरोग्य सेवक (पुरुष) आरोग्य सेविका ( महिला), औषध निर्माण अधिकारी, कंत्राटी ग्रामसेवक, कनिष्ठ अभियंता, कनिष्ठ सहाय्यक, वरीष्ठ सहाय्यक, पर्यवेक्षिका, पशुधन पर्यवेक्षक, लघुलेखक उच्च श्रेणी, विस्तार अधिकारी (कृषी), विस्तार अधिकारी (सांख्यिकी), तसेच स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक अशा विवधि २४२ पदाची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती.

हेही वाचा >>> परदेशी शिष्यवृत्तीसाठी मराठा समाजाकडून केवळ ८२ अर्ज; ओबीसींची संख्या अधिक

त्यानुसार आवश्यक त्या पदाकरीता शैक्षनिक पात्रतेनुसार ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार राखीव प्रवर्गातून नऊशे तर खुल्या प्रवर्गातून एक हजार रुपये परिक्षा शुल्क आकारण्यात आले होते. त्यानुसार २४२ पदाकरीता १२ हजार ३५२ अर्ज प्राप्त झाले असून परिक्षा शुल्कापोटी १ कोटी १८ लाख रुपयाचा महसुल जमा झाला आहे. दरम्यान, परीक्षेचे वेळापत्रक अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. त्यामुळे परीक्षार्थी आता वेळापत्रकाच्या प्रतीक्षेत आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Applications in zilla parishad recruitment 12 thousand 352 applications for 242 posts in washim district pbk