लोकसत्ता टीम
नागपूर: शासनाने एकादशीनिमित्त पंढरपुरला जाणाऱ्या भाविकांना पथकरात सुट दिली आहे. १३ जून ते ३ जुलै दरम्यान स्थानिक प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातून वाहन पास घेऊन प्रवास करणाऱ्या भाविकांना याचा लाभ मिळणार आहे.
आषाढी एकादशीला राज्यभरातून लाखो भाविक खासगी वाहनाने विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जातात. या दरम्यान त्यांना अनेक ठिकाणी पथकर द्यावा लागतो. हा भूर्दंड त्यांच्यावर बसू नये म्हणून शासनाने १३ जून ते ३ जुलै दरम्यान १० मानाच्या पालख्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य विकास महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या मार्गावरील पथकरात सुट देण्याचा निर्णय घेतला आहे. या सोयीसाठी भाविकांना स्थानिक आरटीओत अर्ज करून वाहन पास घेऊन प्रवास करावा लागणार आहे.
हेही वाचा… केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या तयारीसाठी मिळताहेत ५० हजारांचे आर्थिक सहाय्य! वाचा सविस्तर…
नागपूर आरटीओ कार्यालयात या सोयीसाठी सकाळी ९ ते रात्री १० वाजतापर्यंत मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे. येथे अर्ज आल्यावर तातडीने आरटीओ अधिकाऱ्यांकडून प्रक्रिया करून वहन पास उपलब्ध केली जात आहे.