गोंदिया : परिश्रमातूनच यश साधले जाते. ध्येय मोठे ठेवा, पण सुरुवात लहान पण पासूनच करा, मिळेल ते काम प्रामाणिकपणे करून त्यातून स्वतःला सिद्ध करीत यशस्वी व्हा, असा सल्ला गोंदिया येथे आयोजित खासदार नोकरी महोत्सवात खासदार सुनील मेंढे यांनी दिला. या खासदार नौकरी महोत्सवात २१९६ उमेदवारांना नोकरीचे नियुक्ती पत्र देण्यात आले. गोंदिया येथे खासदार नोकरी महोत्सवाचे आयोजन  करण्यात आले होते. यावेळी महोत्सवाचे उद्घाटन करताना खा.मेंढे  बोलत होते.

खा. सुनील मेंढे यांच्या संकल्पनेतून प्रत्यक्षात उतरलेला हा नोकरी महोत्सव त्यांचे वडील दिवंगत बाबुराव मेंढे स्मृती सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून राबविला गेला. या महोत्सवाचे उद्घाटन  प्रसंगी व्यासपीठावर  पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, भाजप गोंदिया जिल्हाध्यक्ष येशुलाल उपराडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नेतराम कटरे, सभापति संजय टेंभरे उपस्थित होते. दीप प्रज्वलानंतर महोत्सवाची सुरुवात झाली. प्रास्ताविक करताना खासदार पत्नी  शुभांगी मेंढे यांनी महोत्सव आयोजना मागची भूमिका स्पष्ट करीत, हा नोकरी महोत्सव तरुणाईचे हात बळकट करण्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न असल्याचे सांगितले.

Devendra Fadnavis claims that Ladaki Bahin Yojana will benefit everyone without discrimination
धर्मभेद न करता लाडकी बहीण योजनेचा सर्वांना लाभ; देवेंद्र फडणवीस यांचा दावा
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
jharkhand assembly election 2024 amit shah attack at rahul gandhi
झारखंडमध्ये ‘राहुल विमान’ कोसळणार! केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची टीका
Cook on Chief Minister Varsha bungalow Arvi constituency
मुख्यमंत्र्यांच्या वर्षां बंगल्यावरील खानसामा ‘ ईथे ‘ काय करतोय ?
article about sudhamma life in forest
व्यक्तिवेध : सुधाम्मा
Brahmagiri Action Committees protest against hill climbing in front of Collectors office suspended
फिरत्या पथकाची आता खाणींवर नजर, वन विभागाच्या आश्वासनानंतर ब्रम्हगिरी कृती समितीचे आंदोलन स्थगित
ajit pawar
पिंपरी: अजित पवारांच्या पक्षाच्या देहू शहराध्यक्षाच्या मोटारीतून रोकड जप्त

हेही वाचा >>> सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात वाघांचे पुनर्वसन लवकरच, चंद्रपूर जिल्ह्यातून येणार वाघ!

मार्गदर्शन करताना जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी, घर आणि गाव न सोडण्याची मानसिकता बदलणे गरजेचे असल्याचे सांगितले. जोपर्यंत घर सोडणार नाही तोपर्यंत तुमच्या पंखांमधील बळ तुम्हाला कळणार नाही. त्यामुळे मिळेल ती संधी स्वीकारा आणि पुढे जा असे त्यांनी सांगितले. उपस्थितांना मार्गदर्शन करताना खा. सुनील मेंढे यांनी आज यशस्वी म्हणून समाज मान्यता असलेल्या अनेकांची उदाहरणे दिली. मात्र या यशामागील परिश्रम ओळखण्याचा सल्लाही त्यांनी दिला. यश हे सहज मिळत नाही. त्यासाठी जिद्द आणि चिकाटी असावी लागते. मी आणि माझे घर या मानसिकतेत बदल करून जगाच्या पाठीवर कुठेही जाण्याची तयारी ठेवणारा तरुणच यशस्वी होऊ शकेल असे ते म्हणाले.

हेही वाचा >>> चक्क महागड्या वाहनांमधून होतेय गोवंशाची तस्करी!; स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईत टोळी गजाआड

कुठल्याही गोष्टीची सुरुवात ही लहानांपासूनच होते. ध्येय प्रचंड मोठे असले तरी सुरुवात लहानांपासून करून नंतर स्वतःला आपल्या कर्तुत्वाच्या जोरावर सिद्ध करा असे सांगत नोकरी महोत्सवात सहभागी झालेल्या तरुण-तरुणींना त्यांनी शुभेच्छा दिल्या. या नोकरी महोत्सवासाठी जवळपास ११ हजार बेरोजगार तरुण तरुणींनी ऑनलाइन पद्धतीने नोंदणी केली होती. यातील ५२९० उमेदवार प्रत्यक्ष मुलाखतींना हजर झाली आणि त्यातील २१९६ उमेदवारांना नोकरीचे पत्र देण्यात आले. सकाळ पासूनच उमेदवारांनी महोत्सवाच्या ठिकाणी प्रचंड गर्दी केली होती.