नागपूरच्या जिल्हाधिकारी विमला आर.यांची बदली झाली असून त्यांच्या जागी नांदेडचे विद्यमान जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांना तत्काळ नव्या पदाचा कार्यभार स्वीकारण्यास सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे डॉ.ईटनकर हे मुळचे वैदर्भीय ( जि.चंद्रपूर) आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विमला आर.यांची बदली पुणे येथे महिला व बालकल्याण आयुक्त या पदावर झाली.त्यांनी जुलै २०२१ मध्ये नागपूरच्या जिल्हाधिकारीपदाची सुत्रे स्वीकारली होती.त्यांना येथे काम करण्यासाठी अल्पकाळ मिळाला. नवे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर २०१४ च्या तुकडीचे आयएएस अधिकारी आहेत. त्यानी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यातून प्रथम तर देशात १४ वा क्रमांक मिळवला होता.त्यांनी एमबीबीएस नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून केले.

नागपूर हे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे गृहशहर आहे. येथे काम करण्यासाठी सनदी अधिकारी उत्सूक असतात. अलीकडच्या काळात नागपूरला मिळालेले ते तिसरे वैदर्भीय जिल्हाधिकारी आहेत.यापूर्वी सचिन कुर्वे ( नागपूर ) रवींद्र ठाकरे ( वर्धा) यांनी या पदावर काम केले.