चंद्रपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोनमधील चिमूर तालुक्यातील कोलारा (तुकूम) गावातील नागरिकांनी सरपंचाच्या मनमानी कारभाराला कंटाळून रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ग्रामपंचायतीला कुलूप ठोकले. रात्रीपासून ग्रामपंचायत कुलूपबंद असून ग्रामपंचायत बरखास्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

राष्ट्रीय ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोनमध्ये कोलारा (तुकूम) गाव वसले आहे. हिंस्त्र व वन्यप्राण्यांच्या हल्याची भिती, वन्यप्राण्यांमुळे पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी होत असलयाने शेतकऱ्यांनी शेती व्यवसायाकडे पाठ फिरविली आहे. वनविभागाने फायर लाईनकडे कोअर जंगल क्षेत्र प्रवेशद्वार उभारावे अशी अनेक वर्षांपासून गावकरी, शेतकऱ्यांची मागणी आहे. त्या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. कोलारा ग्रामपंचायतीचे सरपंच तथा समितीने गावकऱ्यांना विश्वासात घेऊन पत्रव्यवहार, पाठपुरावा केला नसल्याने नागरिकांत प्रचंड आक्रोश निर्माण झाला. तसेच सरपंचानी स्वत:च्या मनमर्जीने ग्रामपंचायत सदस्य, शासकीय नोकरीदार तसेच विविध योजनांचा लाभ घेणाऱ्या व्यक्तींच्या नावे जिप्सी पर्यटनासाठी लावल्याचा आरोप नागरिकांनी केला. दरम्यान सरपंच व वनसमितीच्या अनागोंदी कारभाराविरोधात प्रचंड असंतोष उफाळून आल्यान रविवार १५ ऑक्टोबरला रात्री साडेदहाच्या सुमारास नागरिकांनी ग्रामपंचायत कार्यालयाकडे कुच करीत सरपंचांनी राजीनाम द्यावा, ग्राम पंचायत बरखास्त करावी, अशी मागणी रेटून धरत ग्रामपंचायत कार्यालयास कुलूप ठोकले. यावेळी गावातील शेकडो महिला पुरुषांची उपस्थिती होती.

हेही वाचा – चंद्रपूर : गोंडवाना विद्यापीठ पदभरतीत स्थानिकांवर अन्याय, शैक्षणिक कागदपत्रांमध्ये त्रुटी असतानाही विदर्भाबाहेरील उमेदवारांच्या निवडीचा आरोप

हेही वाचा – सशक्त युवापिढीसाठी ‘नशामुक्त पहाट’, यवतमाळ पोलिसांचा उपक्रम

गावकऱ्यांनी ग्रामपंचायतीला कुलूप ठोकल्याने चिमूर पोलीस स्टेशनला माहिती देण्यात आली आहे. पुढील कार्यवाही सुरू आहे, अशी प्रतिक्रिया कोलारा ग्रामपंचायतीचे सरपंच शोभा कोयचाडे यांनी दिली.

Story img Loader