लोकसत्ता टीम

गोंदिया : आमगाव विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी अर्ज केलेल्यांच्या मुलाखतीकरिता आलेल्या पर्यवेक्षकांसमोरच खासदार नामदेव किरसान आणि आमदार सहेसराम कोरेटी यांचे समर्थक आपसात भिडले. आमगाव शासकीय विश्रामगृहात सोमवारी आयोजित मुलाखतींदरम्यान हा गोंधळ झाला.

Hindra Thakur Vasai program, Hindra Thakur,
वसई : ‘आमने सामने’ कार्यक्रमात ठाकुरांचेच वर्चस्व, हितेंद्र ठाकुरांसमोर विरोधक फिरकलेच नाहीत
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
ss mp shrikant shinde
“चोवीस तास उपलब्ध राहणाऱ्या आमदाराचा विचार करा”, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे आवाहन
Amit Shah made special mention of Devendra Fadnavis in speech in shirala
अमित शहांनी फोन काढला आणि थेट फडणवीसांना लावला… म्हणाले, “पुन्हा…”
Prashant Bamb BJP MLA
“मरेपर्यंत पस्तावशील, हे लोक तुला…”, भाजपा आमदाराची भर सभेत अरेरावी; प्रश्न विचारणाऱ्यांना कार्यकर्त्यांनी हुसकावलं
guruji Nitesh Karale concern over giving opportunity to mp Kale wife Mayura Kale in Maharashtra
Video : कराळे गुरूजींची स्वपक्षीय खासदाराबद्दल ‘खदखद’,काय म्हणाले  ?
batenge to katenge bjp vs congress
भाजपच्या ‘बटेंगे’ला काँग्रेसचे ‘जुडेंगे’
Supriya Sule asked why the investigative agencies are misusing power
सत्तेचा गैरवापर करून तपास यंत्रणांचा ससेमिरा कशासाठी; सुळे यांचा सवाल

देवरी-आमगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार कोरेटी समर्थकांनी याप्रसंगी ‘खासदार नामदेव किरसान मुर्दाबाद,’ अशी घोषणाबाजी केली, तर खासदार किरसान समर्थकांनी ‘आमदार सहेसराम कोरेटी हटाव काँग्रेस बचाव’, आदी घोषणा देत कोरेटी यांना पुन्हा उमेदवारी देऊ नये, अशी मागणी पर्यवेक्षकांना केली. खासदार आणि आमदार समर्थकांनी एकमेकांचे कॉलर पकडून धक्काबुक्की केली, काहींनी अश्लिल शिवीगाळ केल्याचेही बोलले जात आहे. गेल्या ६ ऑक्टोबरला साकोली येथे काँग्रेसकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या ११ जणांनी कोरेटी यांना काँग्रेस निरीक्षक व माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांच्यासमोर विरोध दर्शवला होता. त्यावेळी साकोली विश्रामगृहातही ‘कोरेटी हटाव, काँग्रेस बचाव,’ अशा घोषणा देण्यात आल्या होत्या.

आणखी वाचा-९.४८ लाख ग्राहकांना शून्य वीज देयक! ‘ही’ आहे योजना…

लोकसभा निवडणुकीतील यशामुळे काँग्रेसमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. यामुळे आगामी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी अनेक इच्छुक असून त्यांच्यात चढाओढ आहे. याकरिता आदिवासी समाजातील काहींनी तर सरकारी नोकरी सोडून काँग्रेसकडून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तब्बल १२ जणांनी काँग्रेसकडे उमेदवारी मागितली आहे. विद्यमान आमदार कोरोटे यांच्याशिवाय काँग्रेसचे तिकीट मागणाऱ्यांमध्ये खासदारपुत्र ॲड. दुष्यंत नामदेव किरसान, सेवानिवृत्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार पुराम, पशुसंवर्धन विभागाचे निवृत्त उपायुक्त अनिल कुंभरे, रेल्वे संरक्षण दलातून स्वेच्छानिवृत्ती घेतलेले वासुदेव घरत, शासकीय नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती घेतलेले यशवंत मलये, दिवंगत आमदारपुत्र सावन रामरतनबापू राऊत, मोतीलाल पिहिदे, निलंगे मरस्कोले, सौ. आशा उईके, वामन शेडमाके यांनी उमेदवारीकरिता अर्ज केले आहेत.

आणखी वाचा-खळबळजनक! नवनीत राणांना पुन्हा धमकीचे पत्र, तीन दिवसांत दुसऱ्यांदा हैदराबादमधून धमकी

यापूर्वी साकोली येथे झालेल्या मुलाखतीत काँग्रेस निरीक्षक माजी मंत्री चतुर्वेदी यांनी इच्छुकांच्या भावना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यापर्यंत पोहोचवल्या जातील, असे सांगितले होते. त्यावेळी आमगाव विधानसभा मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्त्यांनी कोरेटी यांना पुन्हा उमेदवारी देऊ नये, तसे झाल्यास काँग्रेसची पराभव निश्चित आहे, असे सांगितले होते. त्याचेच पडसाद सोमवारी आमगाव शासकीय विश्रामगृहात आयोजित मुलाखतींत उमटले. काँग्रेस पर्यवेक्षक बेल्लाह नायक तेजावथ यांच्यासमोर प्रचंड गोंधळ झाला.

या गोंधळामुळे काँग्रेस पक्षात आमगाव-देवरी विधानसभा मतदारसंघात असलेली गटबाजी प्रकर्षाने दिसून आली. काँग्रेसचे वरिष्ठ नेते खासदार आणि आमदार यांच्यावर काय कारवाई करतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.