दहशतवाद, बंड आदी विषयांवरील पुस्तकांना पसंती *’ पचमढीत लष्कराचे अत्याधुनिक केंद्रीय ग्रंथालय
सीमेवर सतत तणावाच्या स्थितीत काम केल्यावर प्रशिक्षणासाठी पचमढीसारख्या थंड हवेच्या ठिकाणी येऊनही भारतीय सैन्यातील अधिकारी आणि जवान दहशतवाद, बंड आणि तत्सम विषयावरील पुस्तकांचे सर्वाधिक वाचन करीत असल्याचे दिसून आले आहे.
पाकिस्तान सीमापलीकडून सातत्याने घुसखोरी आणि चीनची आगळिक होत आहे. वेगवेगळ्या बटालियन आणि रेजिमेंटमध्ये विभागलेले सैन्य आळीपाळीने २४ महिन्यांसाठी सीमेवर तैनात केले जातात.
त्यानंतरच्या काळात हे सैनिक प्रशिक्षण घेत असतात. यासाठी लष्कराचे पचमढी येथे एक प्रशिक्षण केंद्र असून निवड झालेले सैन्य अधिकारी येथे प्रशिक्षणासाठी येतात. या ठिकाणी लष्कराचे केंद्रीय ग्रंथालय आहे. गेल्या दोन वर्षांत या ग्रंथालयातून ‘टेरारिझम इनसरजन्सी अॅण्ड काऊंटर इनसरजन्सी’ हे पुस्तक सर्वाधिक म्हणजे ३६ वेळा वाचनासाठी काढण्यात आल्याची नोंद आहे. एका लॅफ्टनन्ट कर्नल यांनी सर्वाधिक वाचन केले आहे. त्यांनी दोन वर्षांत सर्वाधिक ६० दस्ताऐवज ग्रंथालयातून काढले आहेत.
केंद्रीय ग्रंथालयाची स्थापना १९३९ मध्ये करण्यात आली असून ते डिजिटल आहे. भारतात आतापर्यंत झालेले शासक आणि त्यांची कार्यपद्धतीवरील पुस्तकांपासून तर जगातील विविध युद्धांवरील पुस्तकांचा संग्रह येथे आहे. शिवाय वेगवेगळ्या देशांमधील संबंध आणि त्यांच्याशी झालेले करार यासंदर्भातील पुस्तकांचाही यात समावेश आहे. ग्रंथालय बरकातुल्ला विद्यापीठाच्या ग्रंथालय आणि माहिती विज्ञान विभागाशी संलग्नित आहे. सैन्य दलातील हे एकमेव ठिकाण जेथे इतर विद्यापीठाप्रमाणे ग्रंथालय व माहिती विज्ञान अभ्यासक्रम संचालित केला जातो. या ग्रंथालयाचे वैशिष्टय़ म्हणजे येथे ६५ हजार दस्तावेज आहेत. यात पुस्तके, इ-बुक्स, सीडी/डीव्हीडी, शोध निबंध आहेत. प्रशिक्षण घेणारे सैन्य अधिकारी तसेच जवान, त्यांचे सैन्य अधिकारी, जवानांच्या कुटुंबीय तसेच माजी सैनिकांना हे ग्रंथालय खुले आहे. यात सुमारे दोन हजार विद्यार्थी, सैन्य अधिकारी सदस्य असून दररोज सुमारे ५०० पुस्तके आणि इतर साहित्य वितरित केले जाते. यासंदर्भात संरक्षण दलाचे जनसंपर्क अधिकारी विंग कमांडर समीर गंगाखेडकर म्हणाले, वाचनामुळे मेंदूला चालना मिळते. नवीन कल्पना सुचतात. येथे दुर्मिळ पुस्तके आहेत. जेम्स बामवेल यांचे १८५७ ला प्रकाशित झालेले पुस्तक आहे.
इ-ग्रंथालय
लष्कराचे ग्रंथालय राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्राने तयार केलेल्या ‘इ-ग्रंथालय’ या सॉफ्टवेअरद्वारे स्वयंचलित केले आहे. येथे परिसर व्यवस्थापन प्रणाली असल्याने प्रत्येकाला ग्रंथालयातील पुस्तकांचा सहज वापर करता येतो.
विभागीय ग्रंथालय
केंद्रीय ग्रंथालयात विभागीय ग्रंथालयाची सोय आहे. सुमारे तीन हजार दस्तावेज त्यात आहेत. ग्रंथालय आणि माहिती विज्ञान अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी ते उपयुक्त आहे. येथे डीडीसी, कॉलन क्लॉसिफिकेशन आणि विषयांची पुस्तके उपलब्ध आहेत.
छायाचित्रांचे दालन
येथे भारतीय संसदेच्या सर्व सदस्यांचे ऐतिहासिक आणि दुर्मिळ छायाचित्रे आहेत. सर्व सदस्यांनी संविधानावर स्वाक्षरी केल्यानंतर नवी दिल्लीतील संविधान सभागृहाच्या बाहेर २४ जानेवारी १९५० ला काढलेले छायाचित्र देखील येथे आहे. हे छायाचित्र नामांकित छायाचित्रकार ए.आर. दत्त यांनी काढलेले आहे.
१०० सुवर्ण पुस्तके
केंद्रीय ग्रंथालयात १०० सुवर्ण पुस्तके आहेत. सैन्यदल मुख्यालय, नवी दिल्लीने या पुस्तकांची शिफारस केली आहे. तसेच येथे विविध प्रातांच्या भाषांचा एक स्वतंत्र विभाग आहे. यात मराठी, गुजराती, पंजाबी, मल्याळम, उर्दू, काश्मिरी, तामिळ, तेलगू, कन्नड आदींचा समावेश आहे.