नागपूर : सैन्यदल भरती कार्यालयाच्या वतीने वेगवेगळ्या पदासाठी अग्नीवीर म्हणून भरती आज शनिवार पासून सुरु झाली आहे. त्यासाठी विदर्भातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील युवक काल सायंकाळ पासून नागपुरात दाखल झाले.जनरल ड्युटी, तांत्रिक आणि लिपिक पदासाठी भरती मेळावा होत आहे. पहिल्या फेरीत पात्र उमेदवारांची वैद्यकीय चाचणी २५ ते १७ जून २०२३ दरम्यान घेतली जाईल.

विदर्भ विभागातील ( बुलडाणा जिल्हा वगळून) पात्र पुरुष उमेदवारांसाठी सैन्य भरती मेळावा विभागीय क्रीडा संकुल, मानकापूर, नागपूर येथे आजपासून ते १७ जून २०२३ या कालावधीत आयोजित केला जाईल. हा मेळावा आर्मी रिक्रूटिंग ऑफिस, नागपूर आयोजित करीत आहे.निवडलेल्या उमेदवारांसाठी प्रवेशपत्रे संकेतस्थळावर अपलोड करण्यात आली आहेत.

Story img Loader