वर्धा : सुगंधी तंबाखूवरपण बंदी असली तरी त्याचे रसिक शोध घेत असतातच. अशांचे चोचले पुरविण्यासाठी मग सुरू होते अवैध विक्री. पोलिसांच्या नाकावर टिच्चून विक्री करणारे अखेर जाळ्यात अडकलेच.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शहरात सुगंधी तंबाखूची मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याचे अन्न व औषधी प्रशासनास माहिती मिळाली होती. त्यांनी गुन्हे शाखेचे संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनात जाळे टाकले. त्यात दिनेश भीमराव जयस्वाल, संजय भाऊराव माकोडे, भूषण जीवनलाल राठी तसेच अमरावतीचा श्याम लाहोटी अडकला. त्यांच्या दुकानावर धाड टाकल्यावर सव्वादोन लाख रुपयांचा प्रतिबंधित सुगंधी तंबाखू सापडला. त्यात विमल, पान पराग, जफ्रानी जर्दा, रिमझिम, रत्ना, रजनीगंधा, तुलसी, माणिकचंद पान मसाला, बाबा ब्लॅक व अन्य कंपनीचा माल होता.

हेही वाचा – बुलढाणा : सत्ता संघर्षाबरोबर आमदार रायमूलकरांच्या राजकीय भवितव्याचाही फैसला; ‘त्या’ यादीत नाव, काय होणार?

ही कारवाई उपनिरीक्षक अमोल लगड, चंद्रकांत बुरंगे, श्रीकांत खडसे, सचिन इंगोले, प्रमोद पिसे, मनीष कांबळे, प्रदीप वाघ, पवन पन्नासे, नितीन इटकरे व अखिल इंगळे यांच्या चमूने केली आहे. २०१२ पासून तंबाखूजन्य पदार्थांच्या साठवणुकीवर बंदी आहे. तरीही अवैध साठा सापडून आला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aromatic tobacco worth lakhs of rupees seized in wardha pmd 64 ssb
Show comments