सुमित पाकलवार, लोकसत्ता

गडचिरोली : स्थानिक आदिवासींच्या प्रचंड विरोधानंतरही एटापल्ली तालुक्यातील सूरजागड टेकडीवरील खाणीमध्ये यशस्वीपणे उत्खनन सुरू आहे. त्यामुळे शासनाने त्याठिकाणी पुन्हा सहा नव्या खाणी प्रस्तावित केल्या आहेत. यासाठी देशभरातील तब्बल वीस कंपन्या उत्सुक असून यात काही आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा देखील समावेश असल्याचे कळते.

oil india limited portfolio
माझा पोर्टफोलियो : पोर्टफोलिओला महारत्नाची जोड
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Comrade Subhash Kakuste no more
सत्यशोधक कम्युनिस्ट नेते सुभाष काकुस्ते यांचे निधन
Eurasian Water Cat Pune District, Indapur,
पुणे जिल्ह्यात प्रथमच दुर्मीळ ‘युरेशियन पाणमांजरा’चा शोध, इंदापूरमधील विहिरीमध्ये पडलेल्या पाणमांजराची सुटका
Controversial statement of MP Dhananjay Mahadik on Ladki Bahin Yojana
लाडकी बहीण योजनेवरून खासदार धनंजय महाडिक यांचे वादग्रस्त विधान; खासदार प्रणिती शिंदे, आमदार सतेज पाटील यांचे टीकास्त्र
Rohit Pawar scandal regarding 32 IT companies in Hinjewadi
“हिंजवडी मधील ३२ आयटी कंपन्या गुजरातला जाणार”; रोहित पवारांचा गौप्यस्फोट, गेल्या दहा वर्षात एक ही…!
Marathi Rangbhoomi Divas , Marathi Theatre Day, 5th November
विश्लेषण : रंगभूमी दिन ५ नोव्हेंबरला का असतो? यंदा अद्याप साजरा का झाला नाही?
world eyes on donald trump dealing with big tech during his second term of us president
बलाढ्य टेक कंपन्यांसाठी ट्रम्प यांच्या विजयाचा अर्थ काय ?

हेही वाचा >>> लय भारी! सोळा शासकीय सेवा मिळणार आपल्याच घरी… , राज्यातील पहिलाच ‘सेवादुत’ उपक्रम वर्ध्यात

मागील वर्षभरापासून सूरजागड टेकडीवरील ३४८ हेक्टर वनजमिनीवर लोहखनिजाचे उत्खनन सुरू आहे. लॉयड मेटल अँड एनर्जी लिमिटेड कंपनीला या खाणीचे कंत्राट आहे. नुकतेच या खाणीतील उत्खनन क्षमता ३० लाख टनावरून एक कोटी टन वाढवण्याला परवानगी देण्यात आली. स्थानिक आदिवासी आणि नक्षलवाद्यांच्या प्रचंड विरोधामुळे उत्खननाला तब्बल दोन दशके वाट पाहावी लागली होती. मात्र, वर्षभरापासून याठिकाणी उत्खनन सुरळीत सुरू असल्याने शासन टेकडीवरील उर्वरित सहा खाणी देखील सुरू करण्याच्या तयारीत आहे. यासाठी महिनाभरापूर्वी केंद्रीय खानिकर्म विभागाकडून निविदा देखील मागवण्यात आल्या. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळपास वीस कंपन्यांनी निविदेची कागदपत्रे घेतली असून यावेळेस कंत्राट मिळवण्यासाठी मोठी स्पर्धा पाहायला मिळू शकते. या खाणींमध्ये उच्च दर्जाचे लोहखनिज असल्याने अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा त्यावर डोळा आहे. सोबतच सद्यस्थितीत याठिकाणी उत्खनन करीत असलेली कंपनीसुद्धा उत्सुक असल्याने नव्या कंपन्यांना मोठ्या स्पर्धेचा सामना करावा लागू शकतो.

हेही वाचा >>> मागासवर्गीयांचा ३० हजार कोटींचा निधी अखर्चित; अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या विकासाला खीळ

स्थानिकांचा संघर्ष सुरूच टेकडीवर सद्यस्थितीत सुरू असलेल्या उत्खननामुळे हा परिसर प्रदूषणाच्या विळख्यात सापडला आहे. येथील रस्ते पूर्णपणे खराब झाले आहेत. शेकडो अवजड वाहनांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. स्थानिक रोजगाराचाही प्रश्न गंभीर आहे. त्यामुळे प्रस्तावित खाणींना स्थानिक आदिवासींमधून मोठा विरोध होऊ शकतो. सध्या त्याच भागात खाणविरोधी आंदोलन सुरू आहे.