वाशीम : एका युवकाने इंस्टाग्रामवर जातीय तेढ निर्माण करणारे स्टेटस ठेवल्याने शिरपूर येथे दोन गटात वाद झाला. या घटनेच्या निषेधार्थ शिरपूर, रिसोड आणि मालेगाव शहर कडकडीत बंद ठेवून दोषीवर कारवाईची मागणी करण्यात आली होती. आज, १७ जानेवारी रोजी वाशीममध्येही सकल हिंदू समाजाच्या वतीने निषेध मोर्चा काढून कडकडीत बंद पाळण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी एका युवकाला अटक केली असून तो युवक मुस्लिम नसून हिंदूच असल्याचे आणि त्याने मुस्लिम व्यक्तीच्या नावाने फेक आयडी तयार केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी मंगेश इंगोले या युवकास अटक करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी दिली.

मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन येथे इंस्टाग्रामवर जातीय तेढ निर्माण करणारे वादग्रस्त स्टेटस ठेवल्याने शिरपूर येथे दोन  गटामध्ये हाणामारी होऊन दुकानाची व वाहनाची तोडफोड करण्यात आली होती. त्यानंतर शिरपूर शहर पूर्णपणे बंद ठेऊन त्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला होता. या घटनेच्या निषेधार्थ रिसोड आणि मालेगाव येथेही बंद पाळण्यात आला होता. तर आज वाशीम येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने  पूर्णपणे बंद पाळण्यात आला तर संत सावता माळी चौक येथून शहर पोलीस ठाण्यापर्यंत भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

Gurpatwant Singh Pannun Assassination Plot
“सात महिन्यांपासून तुरुंगात, भारतीय दूतावासातून कोणी…”, गुरपतवंत पन्नूच्या हत्येच्या कटाचा आरोप असलेल्या निखिल गुप्तांची मोठी माहिती
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
mastermind , construction businessman murder ,
पुणे : बांधकाम व्यावसायिकाच्या खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार अटकेत, दोन कोटींच्या खंडणीसाठी अपहरण
three suspect arrested in attempted kidnapping school boy
उमराळ्यात शाळकरी मुलास पळविण्याचा प्रयत्न; तीन संशयितांना अटक
What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : सुरेश धस यांचा आरोप; “संतोष देशमुख हत्या प्रकरणातले आरोपी बिक्कडने पळवले, वाल्मिक कराड आणि…”
What Suresh Dhas Said ?
Suresh Dhas : “…यांनी बीडचा ‘बिहार’ नाही तर ‘हमास’, ‘तालिबान’ केला”, सुरेश धस यांची टीका
shashank ketkar shares post about delayed payment
आधी निर्मात्यांवर आरोप, आता व्यक्त केली दिलगिरी! शशांक केतकरची पोस्ट चर्चेत; म्हणाला, “गैरसमज दूर…”
sajid khan on me too allegation on him
“सहा वर्षांत अनेक वेळा स्वतःला संपवण्याचा…”, MeToo प्रकरणात आरोप झालेल्या बॉलीवूड दिग्दर्शकाने केला खुलासा; म्हणाला…

हेही वाचा >>> नागपूर : शिक्षक उमेदवार अडबाले यांनी मानले महाविकास आघाडीचे आभार, म्हणाले…

हा मोर्चा शहर पोलीस स्टेशन येथे धडकला असता उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी निवेदन स्वीकारले व मुख्य आरोपीला अटक केल्याची माहिती दिली. त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी पत्रकार परिषद घेऊन या घटनेमागील मुख्य आरोपीस अटक केल्याची माहिती दिली. सिंग म्हणाले की, शिरपूर येथे एका हिंदू व्यक्तीनेच मुस्लिम व्यक्तीच्या नावाच फेक इंस्टाग्राम आयडी तयार केले आणि त्यावर हिंदू समाजाच्या भावना भडकतील असे स्टेटस ठेवले. या प्रकरणी पोलिसांनी मंगेश इंगोले या मुख्य आरोपीस अटक केली आहे.

हेही वाचा >>> नागपूर : सुनील केदार यांची उमेदवारीबाबत मोठी घोषणा..; काँग्रेसचा शिक्षक मतदारसंघात यांना पाठिंबा

वादग्रस्त स्टेटस्, पोस्टवर प्रतिक्रिया न देता पोलिसांना कळवा

समाजामध्ये वावरत असताना जर कुठे एखाद्या व्यक्तीस वादग्रस्त किंवा जातीय तेढ निर्माण करणाऱ्या सोशल मीडियावरील पोस्ट, स्टेटस आढळून आल्यास त्यावर तातडीने प्रतिक्रिया न देता संबंधित घटनेची माहिती पोलिसांना द्यावी.ज्यामुळे भविष्यात अशा घटना रोखता येतील, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी केले आहे.

Story img Loader