नागपूर : राज्यात सुरू असलेल्या पदभरतीमध्ये गैरप्रकाराच्या तक्रारी रोज समोर येत आहेत. नोकरी लावण्याचे अमिष दाखवणाऱ्या टोळीचा छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी पर्दाफाश केला. पोलिसांनी एपीआय कार्नरजवळ सापळा रचून करिअर अकादमीच्या तीन संचालकांसह चार जणांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून फोर्ड कारसह सहा मोबाईल, विविध बँकेचे चेक आणि महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यभरात सुरू असलेल्या वन विभागाच्या परीक्षेत मोबाईलवरुन आनलाईन उत्तरे देणाऱ्या रॅकेटचा एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गौतम पातारे यांनी पर्दापाश केला होता. या घटनेनंतर सातारा आणि जिन्सी पोलिसांनी देखील वनरक्षक पदाच्या परीक्षेत गैरव्यवहार करणाऱ्यांना अटक केली होती. ही घटना ताजी असताना सांगली-सातारा भागातील तीन ॲकडमी संचालक हे दलालांच्या मदतीने शहरात विद्यार्थी शोधत असल्याची माहिती मिळाली. यावरुन पोलीस निरीक्षक गौतम पातारे यांच्या पथकाने शुक्रवारी दुपारी एपीआय कार्नरजवळ सापळा रचून कारमध्ये आलेल्या सातारा खटाव मधील संत बाळुमामा अकादमी संचालक आण्णाजी धनाजी काकडे, मानसी अकादमीचे अनिल भरत कांबळे व नवस्वराज्य अकादमीचे संदीप भुतेकर यांच्यासह अकोला, आकोट मधील दलाल अमोल धनराज निचड या चार जणांना अटक केली. या प्रकरणी एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्याचे देविदास नामदेव काळे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arrest of those who cheated by giving answers online from mobile phones in forest department exam dag 87 amy
Show comments