बहिणीकडे आलेल्या नराधमाने तिच्याच घरी भाचीवर शारीरिक अत्याचार केले. नात्याला काळिमा फासणारी व सर्वसामान्यांना चीड आणणारी ही घटना खामगाव शहरात घडली.पुणे येथील रहिवासी असलेला हा चाळीस वर्षीय नराधम खामगाव येथे राहत असलेल्या बहिणीला भेटावयास आला होता. भाऊ (आणि मामा) आल्यामुळे दोघी मायलेकी आनंदी झाल्या.

मात्र, त्यांना वासनांध पाहुण्याच्या मनात काय चालले आहे, याचा थांगपत्ता नव्हता. दरम्यान, रात्रीच्या वेळी नराधम मामाने भाचीवर अत्याचार केला. त्यानंतर तो पसार झाला. मुलीने आईला हकीकत सांगितली. यामुळे तिला धक्काच बसला. मातेने शहर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी पोस्को कायद्याच्या कलम ४,६,८ आणि भादंविच्या कलम ३७६ अ, ३७७, ३७६ आय नुसार गुन्हा दाखल केला. नराधम मामास अकोला येथून अटक करण्यात आली आहे.

Crime News
नराधमाने ओलांडल्या क्रूरतेच्या सीमा, पोटच्या मुलांदेखत महिलेवर बलात्कार; पती घरी येताच अ‍ॅसिड…
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Santosh Deshmukh Brother Dhananjay Deshmukh
Dhananjay Deshmukh : धनंजय देशमुख यांचा मोठा खुलासा, “त्यादिवशी आरोपी आणि एपीआयचं चहाचं बिल मीच दिलं, त्यानंतर त्याने…”
madhuri dixit reveals both sons having inherited love for cooking
“माझ्या दोन्ही मुलांना…”, माधुरी दीक्षितने पतीला ‘या’ गोष्टीचं दिलं श्रेय, आठवण सांगत म्हणाली, “अमेरिकेत असताना…”
Sanjay Raut Slam BJP
Sanjay Raut : शिवसेनेत ‘उदय’ होणार यावर राऊत ठाम, चंद्राबाबू आणि नितीश कुमारांच्या पक्षाबद्दलही केला मोठा दावा; म्हणाले, “यांच्या तोंडाला रक्त…”
shreya talpade and aloknath fir
अभिनेता श्रेयस तळपदे आणि आलोक नाथ यांच्यावर गुन्हा दाखल, फसवणुकीच्या प्रकरणात आले नाव; काय आहे प्रकरण?
young man kills grandmother for greed for money in raigad
पैशाच्या लोभातून नातवानेच आजीचा खून केला
Hemant Dome
अमेय वाघ व हेमंत ढोमे यांच्यात अनेक वर्षे होता अबोला; खुलासा करत म्हणाले, “खूप भयानक…”
Story img Loader