यवतमाळ : कवींना कधी काय सुचेल सांगता येत नाही. म्हणूच ‘ जो ना देखे रवी, ओ देखे कवी!’ ही म्हण अस्तित्वात आली असावी. त्यामूळेच सरकारच्या तुघलकी कारभाराविरोधात संताप व्यक्त करताना आर्णी येथील कवी विजय ढाले यांनी शासनाच्या शाळा दत्तक देण्याच्या निर्णयाविरोधात शासनाला गुन्हेगार ठरविले आहे. या निर्णयाविरोधात सरकारविरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांनी तहसीलदारांकडे केली आहे. शासनाने नुकताच एक अध्यादेश काढला आहे. यात  राज्यातील जिल्हा परिषद आणि नगर परिषदांच्या शाळा दत्तक देण्याचे घोषित केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जो व्यक्ती संबंधित शाळा दत्तक घेईल, त्याने सुचविलेले नाव त्या शाळेला दिले जाईल. यासाठी शासनाने निर्धारित केलेले लाखो रुपयांचे शुल्क त्या व्यक्तीला भरावे लागणार आहे. त्यातून कोट्यवधी रुपयांचे शुल्क गोळा करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. शासनाच्या या धोरणामुळे यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी येथील नागरिक व कवी  विजय ढाले चांगलेच संतापले. त्यांनी या निर्णयाविरुद्ध रीतसर तक्रार लिहून आर्णीचे तहसीलदार परशराम भोसले यांनी दिली. या तक्रारीत  थेट राज्य सरकारवरच गुन्हा दाखल करण्याची मागणी ढाले यांनी केली आहे. या प्रकारामुळे तहसीलदारही चक्रावून गेले आहेत.

हेही वाचा >>> ओबीसी समाजाच्या नाराजीचा फटका बसू नये यासाठी राज्यात भाजपला करावे लागले जातनिहाय जनगणनेचे समर्थन

विजय ढाले आर्णी येथे ज्या सरकारी शाळेत शिकले, ती शाळा शासनाच्या निर्णयानुसार दत्तक देण्याचा घाट घातला जात आहे. सरकारने सामान्य नागरिकांना कोणतीही पूर्व सूचना न देता हा प्रकार केल्याने सामान्यांचा विश्वासघात केला असल्याचा आरोप त्यांनी या तक्रारीत केला आहे. महाराष्ट्र सरकारने हा आदेश काढून धनवान चोरांच्या हाती सामान्यांची शाळा देण्याचा कट रचल्याचा आरोप त्यांनी या पत्रात केला आहे. ही योजना म्हणजे सामान्य विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा सरकारचे षडयंत्र असल्याचे त्यांनी म्हटले आहे. महाराष्ट्र सरकारवर संवैधानिक मार्गाने गुन्हा नोंदविण्याची मागणी विजय ढाले यांनी केली आहे . तहसीलदारांनी विजय ढाले यांचे हे पत्र स्वीकारले आहे. या पत्रामुळे शाळा दत्तक देण्याचा उपक्रम जिल्ह्यात चर्चेत आला आहे.