नागपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील दोन वाघिणीचे ओडिशातील सिमिलीपाल व्याघ्रप्रकल्पात स्थलांतर करण्यात येणार आहे. त्यातील एका वाघिणीला जेरबंद करण्यात यश आले असून ओडिशाला रवाना करण्यात आले आहे. तर दुसऱ्या वाघिणीला दिवाळीनंतर जेरबंद करून ओडिशात पाठवण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातून इतर राज्यात वाघाच्या कृत्रिम स्थलांतरणाचा हा कदाचित पहिलाच प्रयोग असण्याची शक्यता आहे.

सिमिलीपालमधील वाघांच्या संख्येला पूरक म्हणून महाराष्ट्रातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातून दोन वाघीण स्थलांतरित करण्याचा निर्णय ओडिशा वनविभागाने घेतला. ओडिशा वनखात्याने सिमिलीपाल व्याघ्रप्रकल्पातील वाघांची आनुवंशिक विविधता सुधारण्यासाठी इतर व्याघ्रप्रकल्पातून दोन वाघिणी स्थलांतरित करण्याची परवानगी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाकडे मागितली होती. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीची कालमर्यादा सुरुवातीला ३१ ऑक्टोबर होती.

Video captured of collarwali tigress and her cubs while playing in Tadoba Andhari Tiger Project
Video : ताडोबातील “कॉलरवाली” आणि तिचे बछडे..
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Chota Matka a tiger from the Tadoba Andhari Tiger Project gave a glimpse to the tourists
ताडोबात ‘सीएम’चा रोड शो, अन् ताफा…
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
tigress in tadoba andhari tiger project in maharashtra released into similipal tiger reserve in odisha
Video : महाराष्ट्रातील वाघिणीला ओडिशाचा लळा….पहिले पाऊल टाकताच….
tiger upset with tourists in tadoba andhari tiger project
Video : ताडोबातील वाघ म्हणतो, ‘बस आता..! मला तुमचा कंटाळा आलाय’
terror among the villagers after tiger kills man in melghat
मेळघाटात वाघाच्‍या हल्‍ल्‍यात एकाचा मृत्‍यू ; गावकऱ्यांमध्‍ये दहशत

हेही वाचा – Devendra Fadnavis : गरज पडल्यास कुणाचा पाठिंबा घेणार? शरद पवार की उद्धव ठाकरे? फडणवीस म्हणाले, “आम्ही फक्त..”

सिमिलिपाल व्याघ्रप्रकल्पाचे क्षेत्र संचालक प्रकाश चंद्र गोगिनेनी व इतर वनाधिकाऱ्यांचा समावेश असलेले पथक दोन वाहनांसह ताडोबात दाखल झाले. स्थलांतर प्रक्रियेतील इतर बाजू समजून घेण्यासाठी ओडिशा वनखात्याची सहा जणांची चमू नवेगाव-नागझिरा व्याघ्रप्रकल्पात प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आली. यात पहिल्या फळीतील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा समावेश होता. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील वाघांमध्ये सिमिलीपालच्या वाघांशी काही आनुवंशिक समानता असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे ताडोबातील वाघ याठिकाणी स्थलांतरित केल्यास सिमिलीपालमधील वाघांच्या संख्येतील आनुवंशिक विविधता सुधारण्यास मदत होऊ शकते. याच दृष्टिकोनातून या प्रकल्पासाठी ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाची निवड करण्यात आली.

सिमिलीपाल दक्षिण व उत्तर विभागातील वनकर्मचारी तसेच एक जीआयएस तज्ज्ञ यांचा समावेश असलेली चमू रेडिओ कॉलर ट्रॅकिंगसह स्थलांतरणाच्या विविध पैलूंचे प्रशिक्षण घेत आहे. ताडोबातून स्थलांतर करून ओडिशात आणल्या जाणाऱ्या वाघिणीच्या हालचालींचा मागोवा घेण्यासाठी त्यांना रेडिओ कॉलर केले जाईल आणि त्यासाठीच हे प्रशिक्षण त्यांना दिले जात आहे.

हेही वाचा – Bandra Stampede : “स्पेशल ट्रेनला १६ तास उशीर, एक्स्प्रेस फलाटावर येताच…”, पोलिसांनी सांगितला वांद्रे स्थानकातील चेंगराचेंगरीचा घटनाक्रम!

महाराष्ट्राच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील एका वाघिणीचे शनिवारी ओडिशातील सिमिलीपाल व्याघ्र प्रकल्पात स्थलांतर करण्यात आले. या व्याघ्रप्रकल्पातील नवेगाव परिसरातून “टी १५८” या वाघिणीला शनिवारी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास बेशुद्ध करून जेरबंद करण्यात आले. या वाघिणीचे वय सुमारे तीन वर्षे आहे. तिला रेडिओ कॉलर करण्यात आले.

ओडिशा वनखात्याकडून दोन वाघिणींची मागणी झाली होती. ताडोबात वाघांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे राष्ट्रीय व्याघ्रसंवर्धन प्राधिकरणाकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर ही स्थलांतर प्रक्रिया सुरू झाली. त्यातील एका वाघिणीला जेरबंद करून ओडीशातील सिमिलीपाल व्याघ्रप्रकल्पाकडे रवाना करण्यात आले. – विवेक खांडेकर, मुख्य वन्यजीव रक्षक, महाराष्ट्र वनविभाग