गोंदिया : जिल्ह्यातील कलावंतांना एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे आणि त्यांना आपली कला व प्रतिभा समोर आणण्याची संधी मिळावी, हा उदात्त हेतू समोर ठेऊन जिल्ह्यात एक नाट्यगृह उभारण्याचे नियोजन करण्यात आले. त्या अनुषंगाने शहरातील रेलटोली येथे नाट्यगृह उभारण्याकरिता निधी मंजूर करण्यात आला. मात्र, गेल्या १० वर्षांपासून  नाट्यगृहाचे बांधकामच पूर्ण होऊ शकले नाही. यामुळे “कुणी नाट्यगृह देता का नाट्यगृह,” अशी आर्तहाक देण्याची वेळ आता जिल्ह्यातील कलावंतांवर आली आहे. येथील कलावंतांना नाट्यगृहाची तर नाट्यगृहाला निधीची प्रतीक्षा आहे.

गेल्या १० वर्षांपासून गोंदिया नगरपरिषदेतर्फे या नाट्यगृहाचे काम सुरू आहे. २०१२ साली सांस्कृतिक विभागाच्या निधीतून नाट्यगृह उभारण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. या बांधकामासाठी शासनाने १२ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून नगर परिषद प्रशासनाला दिला. मात्र, अद्याप हे बांधकाम पूर्ण होऊ शकले नाही. नगर परिषद प्रशासन निधीच्या कमतरतेमुळे नाट्यगृहाचे बांधकाम रखडल्याचे सांगून हात वर करीत आहे. सध्या जवळपास ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यासाठी शासनाकडे अधिक निधीची मागणी करण्यात आली आहे. मात्र अद्याप निधी मिळालेला नाही. त्यामुळे बांधकाम अपूर्ण अवस्थेत आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. या लेटलतिफीमुळे २०१२ मध्ये जे बांधकाम १२ कोटी रुपयांत होणार होते, त्यासाठी आता ७४ कोटींचा खर्च येणार आहे.

Liquor and fish stocks seized in Bhayander news
मतदारांना आमिषे दाखविण्यास सुरवात; भाईंदरमध्ये मद्य आणि मासळाची साठा जप्त
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Marathi Actress Vishakha Subhedar wrote a special post for son abhinay subhedar birthday
अभिनेत्री विशाखा सुभेदारने लेकाच्या वाढदिवसानिमित्ताने लिहिली खास पोस्ट, म्हणाली, “जे शिकायला परदेशी गेलायस…”
Nishigandha Wad
हिंदी मालिकेच्या सेटवर निशिगंधा वाड यांचा अपघात; तातडीने रुग्णालयात केलं दाखल
paaru serial zee marathi shweta kharat entry
‘पारू’ मालिकेत होणार लोकप्रिय अभिनेत्रीची एन्ट्री! साकारणार खलनायिका, तुम्ही ओळखलंत का? पाहा प्रोमो
Rakul Preet Singh opens up about her diet
हळदीच्या पाण्याचे सेवन अन् दुपारच्या जेवणात…; रकुल प्रीत सिंगने सांगितला तिचा डाएट प्लॅन; म्हणाली, “रात्रीचे जेवण…”
Milind Gawali And Teja Devkar
पैसे संपले, अभिनेत्रीला कल्पना न देता निर्माते झाले पसार; नेमकं काय घडलेलं? मराठी अभिनेत्याने सांगितला ‘तो’ प्रसंग

हेही वाचा >>> अकोला : क्रांतीदिनी ‘पंचप्राण शपथ’; अधिकारी-कर्मचाऱ्यांसह नागरिकांनाही उपक्रमात…

काँग्रेसच्या सत्ताकाळात पायाभरणी

२०१२ मध्ये काँग्रेसच्या सत्ताकाळात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते या नाट्यगृहाच्या बांधकामाची पायाभरणी संपन्न झाली होती. मात्र, १० वर्षांपेक्षा अधिकचा काळ लोटूनही त्याचे बांधकाम अद्याप पूर्ण होऊ शकले नाही.

नगर परिषद प्रशासन म्हणते…

गोंदिया नगर परिषद प्रशासनाने १४ कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली आहे. यापूर्वी १२ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. वाढीव निधी मिळाल्यास उर्वरित बांधकाम लवकरच पूर्ण होईल. सुमारे ७० टक्के काम सध्या झाले आहे, असे नगर परिषदेचे मुख्याधिकारी करण चव्हाण यांनी सांगितले.