वर्धा : जिल्ह्यातील चारही मतदारसंघात सर्वाधिक मतांनी विजयी होण्याचा विक्रम आर्वीत भाजपचे सुमित वानखेडे यांनी रचला. मतदारांवर पक्षाच्या प्रभावापेक्षा सुमित वानखेडे या नावाची जादू अधिक चालल्याची पावती मतमोजणीतून आली आहे. उमेदवारी आली आणि नमनालाच बंडखोरीचे ग्रहण सुरू झाले. दादाराव केचे यांच्या मी म्हणेल ती पूर्वदिशा हे शिस्तप्रिय म्हटल्या जाणाऱ्या भाजपच्या धुरीनांना पटेनासे झाले होते. त्यातूनच गत निवडणुकीत नव्याचा शोध सुरू झाला. यावेळी तो पूर्ण होत वानखेडे यांची उमेदवारी आली. पार्सल म्हणून संभावना विरोधक करू शकले नाही. कारण त्यांचे आजोबा दाजी वानखेडे यांनीच पालिकेत काम करताना शहराचा आराखडा तयार केला होता. तसेच ज्या वॉर्डात सुमित राहतात त्या दाजी वानखेडे वॉर्डात मुस्लीम, खाटीक, मेहतर, अशा कष्टकरी लोकांची वस्ती. त्यामुळे उमेदवारी येताच हमारा बच्चा म्हणून याठिकाणी जल्लोष झाला होता.

निकालानंतर उत्साहाचा उद्रेक दिसून आला. खासदार अमर काळे व आमदार सुमित वानखेडे हे पालिकेच्या ऐतिहासिक गांधी विद्यालयाचे विद्यार्थी. म्हणून बरीच वर्षे आर्वीबाहेर राहूनही वानखेडे यांची उमेदवारी तत्पर स्वीकारल्या गेली. देवेंद्र फडणवीस यांचा पाठीशी असलेला भक्कम हात तीनच वर्षात आर्वीत मोठी कामे मार्गी लावण्यास पूरक ठरला.

Sanjay Raut Criticizes Ajit Pawar From Sharad Pawar Mps
Sanjay Raut: ‘फुटणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे’, शरद पवार गटाचे खासदार अजित पवारांची साथ देणार? संजय राऊत संतापले
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
shinde shiv sena door open to bjp rebels in navi mumbai
भाजपविरोधी बंडखोरांना शिंदे गटाचे दार खुले? पालिकेत वर्चस्व मिळवण्यासाठी व्यूहरचना
BJP, municipal corporation, Mahavikas Aghadi,
विधानसभा निवडणुकीनंतर भाजपची महापालिकेची तयारी, महाविकास आघाडीची पराभूत मानसिकता मात्र कायम
world chess championship loksatta
गुकेशच्या नवचैतन्याची कसोटी!
reactions of students participated in loksatta lokankika competition zws
म्हणूनच लोकसत्ता लोकांकिका इतर स्पर्धांपेक्षा खूप आगळीवेगळी ठरते; स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया
Navneet Rana, Navneet Rana on EVM issue,
‘राजीनामा देण्‍यास तयार, पण…’; नवनीत राणांचे आव्‍हान खासदार वानखडेंनी स्‍वीकारले
Vinayak Raut, BJP , former MP Vinayak Raut,
भाजपचे मताधिक्य गुणवत्तेवर नसून चोरी करून, माजी खासदार विनायक राऊत यांची टीका

हेही वाचा – विदर्भ : विदर्भात महायुतीची लाट, विरोधक भुईसपाट

दरम्यान वानखेडे व्यक्तिगत कामे पण तत्परतेने मार्गी लावतात, अशी प्रशस्ती पक्षनेते किंवा समर्थक नव्हे तर विरोधी असलेल्या नितेश कराळे गुरुजींनी देऊन टाकलेली. म्हणून पुढे आर्वीचा विकास करायचा असेल तर तेरवी, मयत, लग्न हेच उद्दिष्ट ठेवणाऱ्या अमर काळेंपेक्षा सुमित बरा, असे जाहीर बोलल्या जाऊ लागले. त्यांच्यावर एकही आरोप करणे शक्य नसल्याने काँग्रेस आघाडी केवळ भाजपच्या धार्मिक राजकारणावरच टीका करू शकली. उलट वानखेडे व भाजपने टिकेची झोड उडवून दिली होती. ४० वर्षांत काय केले व पुढील चार वर्षांत काळे कुटुंब जनतेसाठी काय करणार, हे पण सांगत नाही, असा अ‍ॅड. क्षितिजा सुमित वानखेडे यांचा जाहीर सवाल आर्वीकर यांच्या मर्मी लागला. माझं सासर हेच व माहेर पण हेच. कुठेच राजकीय आशीर्वाद नाही, असा त्यांचा टोला काँग्रेसच्या मयूरा काळे यांना अलगद बसू लागला. सामांन्यांचा उमेदवार अशी सहानुभूती मिळाली अन् वानखेडे सुसाट सुटले.

हेही वाचा – विदर्भ: ओबीसींची ‘घरवापसी’

मतदासंघातील काळे सहकारी मौन तर वानखेडे सहकारी जोमात. केचे यांची पाठराखण करणारे ९० टक्के भाजप कार्यकर्ते वानखेडेंकडे. म्हणून भाजप, कमळ नाही तर सुमित असेच लोक बोलत असल्याचे चित्र दिसून आल्याचे ज्येष्ठ स्थानिक पत्रकार विजय अजमिरे सांगतात. माझी लढाई देवेंद्र फडणवीस यांच्याशी, असे म्हणणारे खासदार काळे अर्धी लढाई पूर्वीच सोडून गेल्याचे बोलल्या गेले. मतदार त्यावर मोहोर उमटवून गेले आहेत. आता विकासकामांची दिलेली आश्वासने पूर्ण करणे वानखेडे यांना सहजशक्य असल्याचे वर्तमान राजकीय स्थितीतून म्हटल्या जाते. राज्यात सत्ताधारी असलेल्या पक्षाचा आमदार म्हणून लोकांच्या आशा उंचावने अपेक्षितच. ते स्वतः म्हणतात की विकास कामे हाच माझा युएसपी राहणार.

Story img Loader