निकालानंतर उत्साहाचा उद्रेक दिसून आला. खासदार अमर काळे व आमदार सुमित वानखेडे हे पालिकेच्या ऐतिहासिक गांधी विद्यालयाचे विद्यार्थी. म्हणून बरीच वर्षे आर्वीबाहेर राहूनही वानखेडे यांची उमेदवारी तत्पर स्वीकारल्या गेली. देवेंद्र फडणवीस यांचा पाठीशी असलेला भक्कम हात तीनच वर्षात आर्वीत मोठी कामे मार्गी लावण्यास पूरक ठरला.
हेही वाचा – विदर्भ : विदर्भात महायुतीची लाट, विरोधक भुईसपाट
े
दरम्यान वानखेडे व्यक्तिगत कामे पण तत्परतेने मार्गी लावतात, अशी प्रशस्ती पक्षनेते किंवा समर्थक नव्हे तर विरोधी असलेल्या नितेश कराळे गुरुजींनी देऊन टाकलेली. म्हणून पुढे आर्वीचा विकास करायचा असेल तर तेरवी, मयत, लग्न हेच उद्दिष्ट ठेवणाऱ्या अमर काळेंपेक्षा सुमित बरा, असे जाहीर बोलल्या जाऊ लागले. त्यांच्यावर एकही आरोप करणे शक्य नसल्याने काँग्रेस आघाडी केवळ भाजपच्या धार्मिक राजकारणावरच टीका करू शकली. उलट वानखेडे व भाजपने टिकेची झोड उडवून दिली होती. ४० वर्षांत काय केले व पुढील चार वर्षांत काळे कुटुंब जनतेसाठी काय करणार, हे पण सांगत नाही, असा अॅड. क्षितिजा सुमित वानखेडे यांचा जाहीर सवाल आर्वीकर यांच्या मर्मी लागला. माझं सासर हेच व माहेर पण हेच. कुठेच राजकीय आशीर्वाद नाही, असा त्यांचा टोला काँग्रेसच्या मयूरा काळे यांना अलगद बसू लागला. सामांन्यांचा उमेदवार अशी सहानुभूती मिळाली अन् वानखेडे सुसाट सुटले.
हेही वाचा – विदर्भ: ओबीसींची ‘घरवापसी’
मतदासंघातील काळे सहकारी मौन तर वानखेडे सहकारी जोमात. केचे यांची पाठराखण करणारे ९० टक्के भाजप कार्यकर्ते वानखेडेंकडे. म्हणून भाजप, कमळ नाही तर सुमित असेच लोक बोलत असल्याचे चित्र दिसून आल्याचे ज्येष्ठ स्थानिक पत्रकार विजय अजमिरे सांगतात. माझी लढाई देवेंद्र फडणवीस यांच्याशी, असे म्हणणारे खासदार काळे अर्धी लढाई पूर्वीच सोडून गेल्याचे बोलल्या गेले. मतदार त्यावर मोहोर उमटवून गेले आहेत. आता विकासकामांची दिलेली आश्वासने पूर्ण करणे वानखेडे यांना सहजशक्य असल्याचे वर्तमान राजकीय स्थितीतून म्हटल्या जाते. राज्यात सत्ताधारी असलेल्या पक्षाचा आमदार म्हणून लोकांच्या आशा उंचावने अपेक्षितच. ते स्वतः म्हणतात की विकास कामे हाच माझा युएसपी राहणार.