वर्धा: आर्वीचे आमदार दादाराव केचे यांनी सुचविलेली कामे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाने थांबविण्याची जोरदार चर्चा आहे. केचे यांनी फडणवीस यांना थेट आव्हान देण्याचा प्रकार गत आठवड्यात घडला होता. त्या अनुषंगाने केचे यांना हे आव्हान भोवल्याची चर्चा सुरू झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आ. केचे यांनी प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतून कामे प्रस्तावित केली.ते करतांना जिल्हा परिषदेकडे नियोजित कामे, कंत्राटदारांची यादी, त्यांचे मोबाईल क्रमांक पण सोबत जोडले.हीच यादी अशीच त्यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केली होती.

हेही वाचा… विदर्भात कापसाचे दर गेल्‍या वर्षीपेक्षा कमीच

परंतू ही कामे आमदारांनी सुचविलेल्या कंत्राटदारांनाच देणे अडचणीचे ठरले असते.आता उपमुख्यमंत्री कार्यालयातील उपसचीवांचे पत्र धडकले.या कामांचे वाटप करू नये, असे या पत्रात नमूद असल्याचे संबंधित अधिकाऱ्याने स्पष्ट केले. आमदार केचे म्हणाले की हा मोठा विषय नाही.सांगितल्या नुसारच कामे होतील.तक्रार वगैरे काही भाग नाही. पत्राबाबत विचारणा करू.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arvi mla dadarao keches works stopped by dcm office keche challenged devendra fadnavis last week pmd 64 dvr